एचडीएफसींच्या विलीनीकरणाने संपत्तीत वाढ, गुंतवणूकदारांसाठी लाभदायक ठरत आहे
1 min read
मुंबई: (वृत्तसंस्था)- नुकतेच १ जुलै २०२३ रोजी एचडीएफसी लिमिटेड चे एचडीएफसी बॅंकेत विलिनीकरण झाले असून एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँकेच्या दीर्घकालीन वाढीच्या कथेवर विश्वास ठेवून अनेक म्युच्युअल फंड व्यवस्थापकांनी हे दोन्ही स्टॉक त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये दीर्घकाळासाठी ठेवले होते. विशेष म्हणजे बाजारातील चढ-उतारांची पर्वा न करता त्यांनी केलेली गुंतवणूक प्रत्यक्ष विलिनीकरणानंतर लाभदायी ठरली आहे.भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँक आणि गृहकर्ज क्षेत्रातील प्रमुख गृहनिर्माण विकास वित्त महामंडळाच्या विलीनीकरणाने भारतीय बँकिंग उद्योगात एक नवे पर्व सुरू केले आहे. यामुळे मालमत्तेच्या बाबतीत स्टेट बँक ऑफ इंडियानंतर एचडीएफसी बँक ही दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. विलीन झालेल्या एचडीएफसी लिमिटेडच्या ताफ्यातील वितरित कर्जाची रक्कम ३८.७७ टक्क्यांनी वाढून २२.२१ लाख कोटी रुपये होण्याची अपेक्षा आहे.
एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बँक अनेक इक्विटी-ओरिएंटेड म्युच्युअल फंड योजनांच्या आघाडीच्या १० होल्डिंग्सचा भाग आहेत. त्यांनी फंडांच्या युनिटधारकांच्या संपत्तीमध्ये अनेक वर्षांपासून साहाय्य केले आहे. अनेक फंड व्यवस्थापकांनी हे शेअर त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कायम ठेवले आहे. ताज्या आकडेवारीनुसार, एकूण म्युच्युअल फंड उद्योगाने एचडीएफसी बँकेत १,१७,४५६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. तर एचडीएफसी लिमिटेडमध्ये ६१,८०५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेडने गुंतवणूकदारांच्या निधीचा गुणाकारचे केला आहे. ३० जून २०२३ पर्यंत एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेडच्या समभागांनी गेल्या १५ वर्षांमध्ये अनुक्रमे १,५८९ टक्के आणि ६१८ टक्के रिटर्न देत गुंतवणूकदारांना लाभ मिळवून दिला आहे.तसेच एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी हे दोन्ही अनेक सक्रियपणे म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापित योजनांचे पसंतीचे स्टॉक होते. २२ सक्रियपणे व्यवस्थापित योजनांनी (सेक्टर फंड वगळता) त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये १५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी एचडीएफसी बँकेचा स्टॉक ठेवला होता. तर ९ सक्रिय योजनांनी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये १५ वर्षांसाठी एचडीएफसी लिमिटेडचे शेअर ठेवले आहेत.