जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

१८० फ्लाॅप चित्रपटांचा स्टार अभिनेता

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था)- कोणत्या ही चित्रपट इंडस्ट्रीत हाॅलिवूड असो कींवा बॉलिवूड या मध्ये कधी कोणी हिट ठरेल आणि कधी कोणावर फ्लॉपचा ठप्पा बसेल हे सांगता येणार नाही. असे अनेक दिग्गज कलाकार आहेत ज्यांच्या नशिबात फ्लॉप सिनेमांची रांग लागली आहे. त्यात शाहरुख खान, अक्षय कुमार, आमिर खान, राज कपूर, सलमान खान, अमिताभ बच्चन यांच्यासारखे सुपरस्टारदेखील फ्लॉप सिनेमांच्या झटक्यापासून वाचू शकले नाहीत. यांच्याही करिअरमध्ये एक काळ येऊन गेला जेंव्हा त्यांना फ्लॉप सिनेमांचा सामना करावा लागला. मीडिया रिपोर्टनुसार शाहरुखच्या नावे साधारणतः २४ तर राज कपूर यांच्या नावे २९ फ्लॉप सिनेमे आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का, एका अभिनेत्याने दिलेल्या फ्लॉप सिनेमांच्या जवळपासही हा आकडा फिरकत नाही. इंडस्ट्रीत सर्वाधिक फ्लॉप चित्रपट देणाऱ्या बॉलिवूड कलाकारांच्या यादीमध्ये मिथुन चक्रवर्ती हे नाव सर्वात अव्वल असून त्यांच्या एकूण कारकिर्दीत मिथून यांनी जवळपास १८० फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केले. मीडिया रिपोर्टनुसार, मिथुन हे त्यांच्या सिनेकरिअरमध्ये जवळपास ६० % अपयशी ठरले आहेत. या फ्लॉप सिनेमांपैकी ४७ सिनेमे असे आहेत की ज्यांचा समावेश अजिबात न चाललेल्या सिनेमांमध्ये होतो. या आकडेवारीमध्येही मिथून अव्वल आहेत. दरम्यान असे असले तरीही मिथुन यांना स्टार मानले जाते. याचे कारण म्हणजे त्यांनी या १८० फ्लॉप सिनेमांसह ५० हिट चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. हिट चित्रपट देणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये ते चौथ्या स्थानी आहेत. मिथुन यांनी आतापर्यंत एकूण ३०० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. दरम्यान ९० च्या दशकात मिथुन यांच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रमही आहे. त्यांनी सलग ३३ फ्लॉप चित्रपट दिले होते. १९९३-९८ या कालावधीत त्यांचे बॅक टू बॅक ३३ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले होते. डीएनए इंडियाने याविषयी बातमी दिली आहे. तसेच फ्लॉप यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर अभिनेते जितेंद्र आहेत .‌ जितेंद्र यांच्या नावी १०६ फ्लॉप चित्रपट आहे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत शंभराहून अधिक फ्लॉप देणारे हे दोनच कलाकार आहेत. धर्मेंद्र यांच्या नावावर ९९ फ्लॉप आहेत. यानंतर पहिल्या पाचमध्ये ऋषी कपूर -७६ आणि गोविंदा -७५ आहेत. टॉप १० मध्ये संजय दत्त- ७० अमिताभ बच्चन -६८ विनोद खन्ना -६४अक्षय कुमार -५७ आणि राजेश खन्ना -५५ आहेत. तरी १८० चित्रपट फ्लॉप देऊनही अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांना मात्र ‘स्टार अभिनेता’ असे म्हणतात.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.