जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

महागलेल्या टोमॅटोमुळे व्यापाऱ्याकडून ग्राहकास मारहाण

1 min read

पुणे: (प्रतिनिधी)- राज्यात अथवा देशात महागाईने उच्चांक गाठला असून प्रत्येक वस्तूंच्या किंमतीत कितीतरी पटीने वाढ झाल्याचे दिसून येते . या महागाईच्या चक्रव्यूहातून पालेभाज्या सुद्धा वाचवू शकले नाहीत. त्यातच टोमॅटोचे दराने उच्चांक गाठलेला असताना एका व्यापाऱ्याला टोमॅटो २० रुपये पाव महाग म्हणल्याने त्याचा राग अनावर झाल्याने त्याने थेट ग्राहकाला शिवीगाळ करत वजन काट्याच्या लोखंडी वजनाने ग्राहकाला मारले. यात ग्राहक जखमी झाला असून व्यापाऱ्याविरोधात ग्राहकाने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा सगळा प्रकार पुण्यातील वडगावशेरी भाजी मार्केट पुणे, येथे घडला आहे.या प्रकरणी व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिल गायकवाड (रा.वडगावशेरी, पुणे) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गोपाल गोविंद ढेपे (वय ४२ रा. गलांडेनगर, मदर तेरेसा नगर स्कुलजवळ वडगाव पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, वडगाव शेरी भाजी मार्केट पुणे येथे फिर्यादी भाजी घेण्यासाठी गेले असताना, भाजी विक्रेत्याला टोमॅटोचा भाव विचारला असता त्याने टोमॅटो २० रुपये पाव असल्याचे सांगितले. तेंव्हा फिर्यादी व्यापाऱ्याला म्हणाला २० रुपये पावशेर भाव खूप महाग आहे. फिर्यादीने असे म्हणताच व्यापाऱ्याचा राग अनावर झाला, त्याने थेट फिर्यादीला शिविगाळ करण्यास सुरूवात केली.
फिर्यादीने शिविगाळ का करतो, याचा जाब विचारला असता आरोपी व्यापाऱ्याने फिर्यादीच्या तोंडावर बुक्क्यांनी मारायला सुरूवात केली. एवढ्यावरच न थांबता त्याने वजन काट्याच्या लोखंडी मापाने फिर्यादीला मारहाण केली. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी आरोपी गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहे. दरम्यान राज्यात प्रत्येक वस्तूत महागाई पहावयास मिळत असून त्यातच टोमॅटोच्या भावात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या टोमॅटोचे भाव १२०-१५० रुपये पर्यंत जाऊन पोहोचला आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.