जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

उत्तराखंडमध्ये ट्रान्सफॉर्मरचा भीषण स्फोट, १५ जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी

1 min read

नवी दिल्ली: (वृत्तसंस्था) आज दुपारी उत्तराखंडमध्ये ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली आहे. चमोली येथे बुधवारी दुपारी झालेल्या स्फोटात तब्बल १५ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेक जण जखमी आहेत. अलकनंदा नदीजवळ हा स्फोट झाल्याची माहिती आहे. विजेचा प्रवाह उतरल्याने अनेकांना झटका देखील बसल्याचंही वृत्त आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु करण्यात आले असून या दुर्घटनेत एक पोलिस कर्मचारी आणि पाच होमगार्डचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पिपळकोटीच्या आऊट पोस्ट इन्चार्जचाही समावेश आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे .पोलीस उपनिरीक्षक आणि पाच होमगार्डसह सुमारे १५ जणांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक तपास सुरू आहे. रेलिंगवर करंट होता, असे प्रथमदर्शनी दिसून आले. तपासात पुढील तपशील उघड होईल, अशी माहिती उत्तराखंडचे अतिरिक्त पोलीस महासंचालक व्ही मुरुगेसन यांनी दिली. नदीच्या काठावर एक मृतदेह पडलेला होता. त्याला पाहण्यासाठी काही जण गेले असता त्यांनाही विजेचा धक्का बसल्याचे बोलेल जात आहे. नदीकाठाच्या संपुर्ण परिसरात विजेचा प्रवाह पसरलेला आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.