जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार, एका पोलिसासह ४ जणांचा मृत्यू

1 min read

आज पहाटे ५:२३ वाजण्याच्या सुमारास जयपूर-मुंबई एक्सप्रेस ही ट्रेन पालघर स्थानकाजवळून जात असताना चालत्या ट्रेनमध्ये गोळ्या झाडून ४ प्रवाशांची हत्या करण्यात आली आहे. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असून हत्या करणारा पोलीस काॅन्स्टेबल चेतन कुमारला रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने शस्त्रासह अटक केली आहे. दरम्यान या घटनेचं कारण अद्याप पर्यंत स्पष्ट झाले नाही.

मुंबई: (वृत्तसंस्था)- आज पहाटे जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पालघरनजीक चालत्या ट्रेनमध्ये ही गोळीबाराची घटना असून यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे कळते. त्यामुळे हे प्रकरण नेमके काय आहे, याबद्दलची उत्कंठा वाढली आहे.

हा गोळीबार नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्राथमिक माहितीनुसार, जयपूर-मुंबई एक्स्प्रेस पालघर स्थानकाजवळून जात असताना ट्रेनच्या बी-५ या बोगीमध्ये हा प्रकार घडला आहे. त्यानंतर ही एक्सप्रेस ट्रेन मीरारोड स्थानकात थांबवून मृत्यमुखी पडलेल्या चारही व्यक्तींचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. त्या ठिकाणी मृतदेहांचे शवविच्छेदन आणि पुढील सोपस्कार पार पडतील.

मात्र, हा गोळीबार नेमका कशामुळे झाला, या बाबतीत पोलीस तपास करीत आहेत. जयपूर-मुंबई एक्स्प्रेस काहीवेळापूर्वीच मुंबई सेंट्रल स्थानकात दाखल झाली. त्यानंतर लोहमार्ग पोलीस आणि इतर यंत्रणांना तातडीने एक्स्प्रेस ट्रेनचा ताबा घेतला आहे. पोलिसांकडून सध्या पुढील तपासाला सुरुवात झाली आहे. या तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. चोरीच्या प्रयत्नातून ही घटना घडली, असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. जयपूर रेल्वे स्टेशनवरून रविवारी दुपारी दोन वाजता सुटलेली जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेस आज पहाटे ६:५५ वाजता मुंबई सेंट्रल स्टेशनवर पोहोचणार होती. ट्रेनला जयपूर आणि मुंबई दरम्यानचे ११६० किमी अंतर कापण्यासाठी १६ तास ५५ मिनिटांचा कालावधी लागतो. नेमकं काय घडलं?
पहाटे ५.२३ च्या सुमारास बी ५ कोचमध्ये ही घटना घडली. कॉन्स्टेबलने सुरुवातीला प्रवाशांना बंदुकीच्या धाकावर धरले. त्यानंतर आपल्या सहकाऱ्याला गोळ्या घातल्या.

एएसआय टिका राम आणि तीन प्रवाशांचा गोळ्या लागल्याने मृत्यू झाला. आपत्कालीन साखळी ओढून कॉन्स्टेबल चेतन कुमार दहिसरजवळ खाली उतरून पळून जाण्याचा प्रयत्न केला.भाईंदरच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने त्याला शस्त्रासह अटक केली. गोळीबाराचा पुढील तपास सुरू असल्याचे पश्चिम रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.