जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

आता वर्षातून दोनदा होणार बोर्ड परीक्षा ; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय

1 min read

पुणे: (वृत्तसंस्था)- सरकारकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी नवीन निर्णय घेण्यात आला आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असते. या परीक्षेला शिक्षणातील टर्निंग पाईंट म्हंटले जाते. यानंतर कोणत्या क्षेत्रात करियर करायचे आहे, यासंदर्भातील निर्णय विद्यार्थी घेतात. आता दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. या परीक्षेसंदर्भात काही महत्त्वाचे बदल मंत्रालयाने केले आहे. हा बदल करुनच आता २०२४-२५ या शैक्षणिक सत्रात पुस्तके येणार आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत शालेय शिक्षणाचा हा अंतिम आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने म्हणजेच एनसीईआरटीकडून हा आराखडा प्रसिद्ध झाला आहे.

सरकारकडून कोणतं बदल करण्यात आले आहे.

दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. हा बदल लक्षात घेऊनच अभ्यासक्रमाची आखणी आगामी शैक्षणिक वर्ष २०२४- २५ साठी करण्यात येत आहे. त्यानंतर ही पाठ्यपुस्तके येणार आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम तयार केला जात आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा देता येणार आहे. तसेच या परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी विद्यार्थ्यांकडे असेल.

का केला बदल? बदल करण्याचं कारण?

विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षेचा ताण येऊ नये, संबंधित परीक्षा ही त्यांच्यासाठी सुलभ असाव्या, त्यांना चांगले गुण मिळविण्याची संधी मिळावी, या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन भाषा सक्तीच्या असणार आहे. त्यातील एक भाषा स्थानिक तर दुसरी भारतीय भाषा असणार आहे.

या रचनेअंतर्गत होणार बदल.

नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणाची रचना बदल करण्यात आली आहे. नव्या धोरणात ५-३-३-४ अशी तयार केली गेली आहे. म्हणजेच तीन ते आठ वय असणारे पहिल्या पाच गटात, त्यानंतर आठ ते ११ वय असणारे दुसऱ्या तीनच्या गटात, ११ ते १४ वय असणारे तिसऱ्या तीनच्या गटात तर आणि १४ ते १८ असे वयोगटानुसार शेवटचा चारचा गट आहे.

आतापर्यंत शिक्षणाचा १०+२ चा पॅटर्न सुरू होता. तो पॅटर्न २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात रद्द होईल तसेच आतापर्यंत दहावी आणि बारावीला वर्षाच्या शेवटी बोर्ड परीक्षा देता येत होती. दहावी नंतर दोन आणि नंतर ३ वर्षे अशा पॅटर्नमध्ये या निर्णयामुळे बदल होणार आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.