जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

13 February 2025

आता गुगल मॅप्सच्या सहायाने नवीन ठिकाणचे प्रवास होणार सोयीस्कर

1 min read

•शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असली तरी आजकालच्या धकाधकीच्या जीवनात एकटे किंवा कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत आपण बाहेर फिरायला जातो, तेच काही क्षण खास आणि आनंद देणारे असतात. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या असल्या तरी आता पावसाळी पिकनिकसाठी देखील अनेकजण सज्ज झाले आहेत. तर अशावेळी तुम्ही देखील भटकंतीसाठी कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर गुगल मॅपची खास वैशिष्ट्ये तुमच्यासाठी फारच उपयोगी ठरु शकतात. त्यासाठी जाणून घेऊया Google Maps ची काही खास फीचर्स जी तुम्हाला पिकनिकला गेल्यावर मदतगार ठरेल.गुगल मॅप्समध्ये ग्लान्सेबल डायरेक्शन्स फीचर सुरू करण्यात आले आहे. ही सेवा वापरुन वापरकर्ता आपल्या लॉक स्क्रीनच्या माध्यमातून देखील आपला रस्ता ट्रॅक करु शकतात. हे फीचर चालू केल्यानंतर, वापरकर्त्यांना पुढे येणारे वळण किंवा कोणत्याही अपडेटबद्दल कळवले जाईल. यापूर्वी ही माहिती नुसतं फुल नेव्हिगेशन मोडमध्ये दिली जात होती. हे फीचर्स काही महिन्यांतच जगभरात आणले जाईल. हे वॉकिंग, सायकलिंग आणि ड्रायव्हिंग मोडमध्ये नक्कीच मदत करेल. सदरील सिस्टीम अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही डिव्हाईसवर उपलब्ध करून दिले जाणार आहे.Google ने Google मॅप्समध्ये एक नवीन सेवा उपलब्ध करून दिली आहे जी वापरकर्त्यांना Google मॅप्सची विंडो बंद केल्यावरही त्यांच्या रिसेंट
​ॲप्समध्ये लोकेशन सेव्ह करुन ठेवण्याची सोय करुन देतील. वापरकर्त्यांना त्यांनी यापूर्वी भेट दिलेली सर्व ठिकाणे हटवण्याची परवानगी सदरील सेवेमध्ये असेल. हे फीचर वापरकर्त्यांना पिकनिक किंवा विशिष्ठ ठिकाणी जाताना त्यादरम्यान विश्रांतीसाठी थांबल्यास जिथे प्रवास थांबवला तिथून पुढे सुरु करता येणार आहे. Google ने अलीकडेच ॲमस्टरडॅम, डब्लिन, फ्लॉरेन्स आणि व्हेनिस या चार शहरांमध्ये इमर्सिव्ह View सादर केले आहे. लवकरच इतर ठिकाणीही हे फीचर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये, प्रगत AI तंत्रज्ञानाचा वापर करून, इमर्सिव्ह व्ह्यू फीचर अगदी वास्तवदर्शी स्थान, ठिकाणे तयार करते. यामध्ये अनेक महत्त्वाच्या माहितीचाही समावेश करण्यात आला असून हे गूगल मॅप्समधील फीचर तसे जुनचं आहे, पण सर्वात महत्वाचे फीचर आहे. त्याचे कारण असे की आपण गुगल मॅपच्या मदतीने कुठेही जात असताना थोडे जरी आपल्या मोबाईलची दिशा बदलली आणि आपल्याला आपला ट्रॅक दिसत नसेल तर रिसेन्टरवर क्लिक करताच आपण पुन्हा ट्रॅकवर येतो. तसेच मॅप पाहताना एखादे दुसरे ठिकाण आपण मॅपमध्ये पाहत असले तरी आपला ट्रॅक भरकटतो पण रिसेन्टरवर क्लिक करताच आपण पुन्हा ट्रॅकवर येतो. आपण जेंव्हा गुगल मॅप्स वापरताना आपल्याला हवे असलेले लोकेशन टाकतो आणि त्यानंतर आपण बाईक, कार किंवा वॉकिंग साठी ज्या ठिकाणी जाणार आहोत, ते सिलेक्ट करतो. यामुळे गुगल आपल्याला त्याप्रमाणे रस्ता दाखवते. म्हणजे टू व्हिलरने जाण्यासाठी आणि कारने जाण्यासाठी सेम ठिकाणी वेगवेगळा टाईम कधीकधी रस्ताही वेगवेगळा दाखवतो. हे खास गुगलचं फीचर फारच उपयोगी असून नवीन ठिकाणी आपण प्रवास करत असताना सदरील फीचर आपली मोलाची मदत करेल यात शंका नाही.