लोकनेते स्व.विनायकराव मेटे यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न
1 min read
बीड (प्रतिनिधी)- लोकनेते विनायकराव मेटे यांची ३० जून रोजी जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे . त्याचंच एक भाग म्हणून काल दि. २५ जून रोजी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवसंग्राम संघटनेच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. यात बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी रक्तदान कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
विनायकराव मेटे यांनी त्यांचा वाढदिवस नेहमी समजिक उपक्रमांनी साजरे केले त्यांना अभिप्रेत अश्या कार्यक्रमांनी त्यांची जयंती साजरी करण्याचा मानस त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी केला असून आज मुंबई, उत्तर मुंबई, दिंडोशी, पेन, नाशिक , वाशिम , रिसोड, छ. संभाजी नगर, पनवेल आदि जिल्ह्यात रक्तदान शिबिर संपन्न झाले असून यात असंख्य रक्तदात्यानी रक्तदान केले आहेत. बीड जिल्ह्यात नेकनुर, मंजारसुभा आणि बीड शहर या तीन ठिकाणी ३२० पेक्षा अधिक रक्त दात्यानी रक्तदान केले. आणि स्व. विनायकराव मेटे यांच्या प्रती आपली श्रद्धांजली अर्पण केली आहे. या वेळी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.