जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

त्या आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्या प्राध्यापकाला तात्काळ निलंबित करावे ; महाविद्यालयीन प्रशासनाला मागणी

1 min read

बीड: (प्रतिनिधी)- गेल्या बुधवारी शहरातील के.एस.के महाविद्यालयात फळ्यावर आणि बेंच वर आक्षेपार्ह मजकूर लिहीण्याची घटना घडली होती. यामुळे समस्त मुस्लिम समाजाच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या आहेत. आणि या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आक्षेपार्ह मजकूर लिहिणाऱ्या
त्या समाजकंटकावर कायदेशीर कारवाई झालीच परंतू महाविद्यालय प्रशासनाने या बाबतीत कोणतीही कारवाई केली नाही म्हणून त्या प्राध्यापकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे . या मागणीसाठी आज मुस्लिम समाजाच्या एका शिष्टमंडळाने डॉ. योगेश क्षीरसागर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांची भेट घेऊन त्या प्राध्यापकाला तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी केली आहे.
यात सर्वानुमते एकच प्रखर मागणी होत होती ती म्हणजे त्या प्राध्यापकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे तसेच या पुढे अशी घटना महाविद्यालयात होऊ नये याची खबरदारी घेण्यात यावी. यावर महाविद्यालयीन प्रशासनाच्या वतीने डॉ.योगेश क्षीरसागर आणि प्राचार्य यांनी एक समिती स्थापन करून लवकरात लवकर या बाबतीत निर्णय घेऊन कारवाई करू तसेच अशी घटना पुन्हा घडू नये याची दक्षता घेवू अशी ग्वाही दिली आहे. यावेळी शिष्टमंडळात,
नगरसेवक मुखिद लाला, खाजा बॉस,नगरसेवक इलियास भाई,नगरसेवक मुन्ना इनामदार,नगरसेवक इकबाल बॉस,शेख बिलाल,शेख शहेबाज,साजेद जलील खान, नबिल सादेक जमा,समीर सरकार,साजेद जाहगिरदार,शाहनवाज खान,इकबाल भाऊ, काशेफ चाऊस, माजेद कुरेशी,वाजेद कुरेशी,समीर कुरेशी,फय्याज कुरेशी,अनिस शेख,मोमीन सद्दाम, आदी उपस्थित होते.