जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात २१६ जागांपैकी ६० पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध

1 min read

बीड: (प्रतिनिधी)- वक्फ बोर्डात आतापर्यंची सर्वात मोठी भरती होत आहे . महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या आस्थापनेवरील जिल्हा वक्फ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता व विधि सहाय्यक ही पदे सरळ सेवेने भरण्याकरीता जाहिरात प्रसिध्द झाली आहे. वक्फ बोर्डाच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 60 पदांसाठी जम्बो नोकर भरती होत असुन पात्र उमेदवारांनी या भरती प्रक्रियेचा लाभ घ्यावा असे आवाहन वक्फ बोर्डाचे सदस्य समीर काझी यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या आस्थापनेवरील 216 जागा भरण्याच्या अनुषंगाने अध्यक्ष आ.वजाहत मिर्झा, सदस्य खा.इम्तीयाज जलील, फौजीया खान, सदस्य समीर काझी, मुदस्सीर लांबे व इतर सदस्यांनी सातत्याने राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. अखेर त्यास मंजुरी मिळाली असून २१६ पैकी पहिल्या टप्प्यातील ६० पदांच्या जागा करीता जाहिरात प्रसिध्द झाली असून त्यामध्ये जिल्हा वक्फ अधिकारी- अधिक्षक- २५ पदे, कनिष्ठ लिपिक ३१, लघुटंकलेखक ०१, कनिष्ठ अभियंता ०१ आणि विधि सहाय्यक ०२ अशा ६० पदांचा समावेश आहे. नमुद पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांचे वय ०१ जुलै २०२३ या तारखेस गणण्यात येईल. सर्व पदांसाठी किमान वय १८ वर्षें असावे व कमाल ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे. वक्फ मंडळाच्या सेवेतील कार्यरत कर्मचार्‍यांसाठी कमाल वयोमर्यादा ४८ असून अर्जदार हा मुस्लीम असावा, त्याला उर्दू भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. सदरील पदांसाठी पात्र उमेदवारांनी विभागाच्या संकेतस्थळावर दि.०५ ऑगस्ट २०२३ पासून ०४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी व अर्जासाठी अल्पसंख्याक विकास विभागाच्या https://mahawakf.com किंवा https://mahawakf.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या आस्थापनेवरील २१६ जागांच्या भरतीसाठी अध्यक्ष व सदस्यांनी पाठपुरावा केलेला आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ६० पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिध्द झाली आहे. त्या अनुषंगाने पात्र उमेदवारांनी या भरती प्रक्रियेचा लाभ घ्यावा असे आवाहन वक्फ बोर्डाचे सदस्य समीर काझी यांनी केले आहे.