विस्फोट सारख्या विचित्र आवाजाने रायगड जिल्हा हादरला ; प्रशासकीय यंत्रणा सज्ज
1 min readरायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून विचित्र आवाज येत आहे . या विस्फोट सारख्या विचित्र आवाजामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या आवाजाचे नेमकं कारण शोधण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
महाड: (वृत्तसंस्था)- महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांपैकी एक स्थळ असलेला रायगड जिल्हा सध्या या जिल्ह्यातील महाड तालुक्यात कसबे शिवथर गावात गेल्या दोन दिवसांपासून भूगर्भातून मोठे विचित्र आवाज येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या सगळ्या घटनेनंतर महाडचे प्रांत अधिकारी डॉ. ज्ञानोबा बनापुरे, पोलीस निरीक्षक मारुती आंधळे व प्रशासनाने गावात येऊन ग्रामस्थांशी संवाद साधून योग्य त्या सूचना दिल्या आहेत. या भागाची पाहणी करण्याकरिता सोमवारी भूगर्भ शास्त्रज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. तसेच ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
शनिवारी सकाळी आपत्ती व्यवस्थापन टीम, एमआयडीसी पोलिस अधिकारी, महाड तहसीलदार , तसेच N.D.R.F च्या टीमने कसबे शिवथर गावाला भेट देवून संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली तसेच भूगर्भशास्त्रज्ञ गावाला भेट देऊन पुढील तपास करणार आहे.
सदरील आवाज नेमके कशामुळे येत आहेत, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महाड तहसीलदार प्रांत या सगळ्यावर लक्ष ठेऊन आहेत.
दरम्यान शनिवारी याच परिसरात मोठे आवाज येत असल्याची माहिती या गावातील स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. ग्रामस्थांना सावधानतेच्या सूचना देण्यात आले आहेत सोमवारी या ठिकाणी भूगर्भ शास्त्रज्ञ भेट देणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यातील काही भाग हा दरड कोसळणे भूगर्भात घडणाऱ्या घटना यासाठी काहीसा संवेदनशील बनला आहे. शिवथरघळ गावात विस्फोटासारखे मोठे आवाज येत असल्याने ग्रामस्थांनी दोन दिवसापूर्वी आपली राहते घरी सोडून सुरक्षित ठिकाणी मंदिर परिसरात आसरा घेतला होता. हे आवाज नेमके कोणत्या कारणामुळे येत आहेत हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या सगळ्या घटनांमुळे ग्रामस्थांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण आहे. शनिवारीही अशा स्वरूपाचे आवाज झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे.
१५ दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडी दुर्घटनेत अख्खी वाडी डोंगराखाली गाडली गेली. या दुर्घटनेत जवळपास ८० माणसे मृत्यूमुखी पडली होती. या घटनेनंतर प्रशासनाने पुन्हा एकदा दरड प्रवण क्षेत्रात सर्व्हे करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमी वर शिवथर येथे येत असलेले भूगर्भातून मोठे आवाज हे ग्रामस्थांच्या जिवाचा थरकाप उडवत आहेत. प्रशासनाने या सगळ्याची गंभीर दखल घेतली असून आज येणार्या भूगर्भ शास्त्रज्ञांकडून नेमका कोणता अहवाल दिला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहेत.