स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यामध्ये आहेत हे नेमके फरक
1 min readबीड सम्राट न्युज: (समीर फारोकी)- 🇮🇳 सर्वप्रथम सकल भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..! 🇮🇳
आपल्या देशाचं मुख्य राष्ट्रीय सण म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन्ही दिवस भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाचे असून या दोन्ही दिवशी आपण राष्ट्रीय ध्वजारोहण करतो मात्र या दोन्ही दिवसांमध्ये काय फरक आहे आणि कोणत्या वेगवेगळ्या नियम आहे हे जाणून घेऊया.
यंदा भारत देश आपला ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहेत. १५ ऑगस्ट २०२३ रोजी भारत आपल्या स्वातंत्र्याची ७६ वर्षे पूर्ण करणार आहे. भारतामध्ये १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन हे दोन दिवस संबंध देशात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. पण आपल्याला फक्त ध्वजारोहण करणे आणि राष्ट्रगीत म्हणून भारत मातेला वंदन करणे या दोनच गोष्टी ठाऊक आहेत. म्हणूनच आज जाणून घेऊया स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिन यामध्ये नेमका फरक काय आहे.
यातला साधारण फरक म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला. म्हणजे इंग्रजांच्या गुलामीतून आपली सुटका झाली आणि भारताचा ध्वज देशभरात फडकावला गेला. तर २६ जानेवारी रोजी केला जातो तो प्रजासत्ताक दिन. २६ जानेवारी १९५० रोजी म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्या नंतर साधारण तीन वर्षांनी भारतीय राज्यघटना देशभरात लागू करण्यात आली. देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्यांचे हक्क मिळावेत यासाठी संपूर्ण भारतात संविधान लागू करण्यात आले. हे दोन्ही दिवस देशासाठी अत्यंत मानाचे आणि महत्वाचे आहेत. या दोन्ही दिवशी ध्वजारोहण केले जात असले तरी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन दोन्ही साजरे करण्याची पद्धत आणि नियम वेगळे आहेत. दोघांमध्येही बराच फरक आहे, त्याचे हे थोडक्यात विश्लेषण सादर आहे .
🔴या दोन्ही दिवशी ध्वजारोहण करण्याचे नियम ही वेगवेगळी आहेत. १५ ऑगस्टला तिरंगा वर खेचून मग ध्वजारोहण केले जाते तर प्रजासत्ताक दिनी ध्वज शीर्षस्थानी आधी बांधला जातो आणि मग तो तिथेच उघडून फडकवला जातो.
🔴आपल्याकडे दोन्ही दिवशी ‘ध्वजारोहण’ असाच शब्द वापरला जातो. पण ते साफ चुकीचे आहे. स्वातंत्र्य दिनाला ‘ध्वजारोहण’ केले जाते तर प्रजासत्ताक दिनाला ध्वज ‘फडकावला’ जातो.
🔴स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान ध्वजारोहण करतात तर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती झेंडा फडकावतात.
🔴स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले जाते आणि प्रजासत्ताक दिनी राजपथावर ध्वज फडकवला जातो.
🔴पंतप्रधान हे राजकीय पदावर असल्याने देश स्वतंत्र झाला तेंव्हा प्रथम त्यांची नियुक्ती केली गेली. त्यामुळे स्वातंत्र्य दिनी पंतप्रधान ध्वजारोहण करतात तर प्रजासत्ताक दिनी, १९५० साली ‘राष्ट्रपती’ हे देशाचे घटनात्मक पद निर्माण करून त्याजागी राजेंद्र प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली, तेंव्हापासून प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वज फडकावला जातो.
🔴स्वातंत्र्यदिनी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर समारंभ होतो आणि त्यानंतर पंतप्रधान ध्वजारोहण करतात आणि देशाला संबोधित करतात.प्रजासत्ताक दिनी, देशाचे प्रथम नागरिक म्हणजेच राष्ट्रपती या कार्यक्रमात सामील होतात आणि ध्वज फडकावतात . हे राष्ट्रीय राजधानीतील राजपथावर साजरे केले जाते. त्यानंतर परेड, राज्य टॅबलेक्स, तोफखाना प्रदर्शन हे कार्यक्रम होतात.