जास्त झोपणं आरोग्यासाठी घातक ; यामुळे मृत्यूला सामोरे जावे लागेल
1 min readबीड सम्राट न्युज: आपल्यापैकी बरेच जण कधीही, कुठेही झोपू शकतात.पण वैज्ञानिक संशोधनातून हे स्पष्ट होते की ८ तासांपेक्षा जास्त झोप घेणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तसेच कमी झोप देखील हानिकारक आहे. काही लोक असे आहेत जे दररोज आवश्यकतेपेक्षा जास्त झोपतात, परंतु तुम्हाला माहित आहे का की कमी झोपणेच नाही तर जास्त झोपणे देखील तुमच्यासाठी हानिकारक असू शकते.
दर २४ तासांत इतके तास झोपणे आवश्यक आहे.
तुमच्या वयानुसार झोपायला हवी. जर तुमचे वय वीस वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही दररोज सात तासांची झोप घ्यावी. पण जर तुम्ही 50 ते 60 वर्षां पुढील असाल तर तुम्ही सात ते आठ तास झोपले पाहिजे.
जास्त झोपीमुळे वजन वाढते तसेच लठ्ठपणा येतो.
शरीराच्या वाढत्या लठ्ठपणाचा थेट परिणाम तुमच्या झोपण्याच्या वेळेवर होतो. जेंव्हा तुम्ही झोपता तेंव्हा तुमचे शरीर कॅलरीज बर्न करत नाही. त्यामुळे तुमच्या शरीराचे वजन वाढते.
यामुळे डोकेदुखी निर्माण होते.
जे लोक जास्त झोपतात त्यांना डोकेदुखी सामान्यतः दिसून येते. हे मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरमधील चढउतारांमुळे असू शकते, ज्यामध्ये झोपेच्या दरम्यान सेरोटोनिनमध्ये वाढ होते, ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते.
नेहमी पाठदुखी.
जास्त वेळ झोपल्याने पाठदुखी होऊ शकते. असे घडते कारण जास्त वेळ झोपल्याने शरीरातील रक्तप्रवाहावर वाईट परिणाम होतो आणि तुमची पाठ ताठ होते.
हृदयविकाराचा धोका वाढतो.
अमेरिकन जर्नल ऑफ कार्डियोलॉजीच्या अहवालानुसार, हृदयविकाराचा धोका वाढतो. आणखी एका संशोधनात असे आढळून आले आहे की, उशिरा झोपल्यामुळे पक्षाघाताचा धोका ४६ टक्क्यांनी वाढतो. या अभ्यासानुसार, ज्या महिला ९ ते ११ तास झोप घेतात त्यांना हृदयविकाराचा धोका ३८ टक्के वाढतो.
उदासीनता येण्याचं कारण.
जास्त वेळ झोपल्याने तुमच्या मूडवर परिणाम होतो आणि त्यामुळे नैराश्य देखील येऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, झोपेचा मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरवर परिणाम होतो. जास्त वेळ झोपल्याने शारीरिक हालचाली कमी होतात, तर तुमचा मूड सुधारणार्या न्यूरोट्रांसमीटरची पातळी वाढवण्यासाठी अधिक शारीरिक हालचाली महत्त्वाच्या असतात.
मधुमेहाचा आजार होण्याची शक्यता असते.
जास्त वेळ झोपल्यामुळे व्यक्तीची शारीरिक हालचाल नगण्य होते आणि रक्तातील शुगर लेव्हल वाढण्याचा धोका वाढतो. काही वर्षांपूर्वी, टोकियो विद्यापीठाने १२हून अधिक अभ्यासांवर संशोधन केल्यानंतर सांगितले होते की, ९ तासांपेक्षा जास्त वेळ झोपणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात साखरेचा धोका वाढतो.
जोडप्यांमध्ये जास्त झोपेमुळे गर्भधारणेची क्षमता कमी होते.
हे एका वैज्ञानिक संशोधनात सिद्ध झाले आहे की जे जोडपे जास्त झोपतात. कमी झोप घेणाऱ्या स्त्रियांपेक्षा त्यांची गर्भधारणेची क्षमता कमी होते.कोरियन महिलांवर केलेल्या संशोधनानुसार, ज्या महिला ७ ते ८ तास झोपायच्या. त्या महिलांमध्ये गर्भधारणेचे प्रमाण ५३% होते.
जास्त झोपेचे एकंदरीत नुकसान, लवकर मृत्यू.
शास्त्रज्ञांच्या संशोधनात असे समोर आले आहे की जे लोक कमी झोपतात त्यांच्यापेक्षा जास्त झोपणारे लोक लवकर मरतात.