जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

चावल्यावर हाडांचा चुरा होईल ; या कारणांमुळे अमेरिकन बुली या श्वानावर टाकली बंदी

1 min read

ब्रिटन: (वृत्तसंस्था)- ब्रिटनमधल्या वॉल्सॉलमध्ये अमेरिकन बुली डॉगच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर बर्मिंगहॅममधल्या बोर्डेस्ले ग्रीन मध्ये एका ११ वर्षांच्या मुलीवर या जातीच्या कुत्र्याने हल्ला केला.

या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकाच आठवड्यात झालेल्या या दोन भयंकर घटनांची थेट पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दखल घेतली असून आपातकालिन बैठक बोलावत अमेरिकन बुली डॉग्स जातींच्या कुत्र्यांवर तात्काळ बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या जातीच्या श्वानप्रेमींनी मात्र या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. हा कुत्रा दिसायला भीतीदायक वाटत असला तरी तो प्रेमळ आणि माणसाळलेला आहे.

हा कुत्रा शक्तीशाली असला तरी सौम्य आणि मैत्रीपूर्ण असतो. क्वचितच हा कुत्रा आक्रमक होतो आणि हल्ला करतो .

१९८० च्या दशकात हे कुत्रे अमेरिकेत आढळत होते. अमेरिकी पीटबुल टेरियर्स आणि अमेरिकी स्टॅफोर्डशायर टेरियर्सचे क्रास ब्रिडमधून या कुत्र्याचा जन्म झाला आहे.

त्याला अमेरिकन बुली डॉग असे नाव देण्यात आले आहे. अमेरिकन बुली डॉगचे चार प्रकार आहेत. यात स्टॅंडर्ड, पॉकेट, क्लासिक आणि एक्सएल. अमेरिकी बुली एक्सएलचे वजन जवळपास ६० किलोहून अधिक असते.

अमेरिकन एक्सएल बुली डॉग प्रेमळ वाटत असले तरी ते आक्रमक झाल्यावर कोणाचंच ऐकत नाहीत. या कुत्र्यांमध्ये इतकी ताकद असते की एखाद्याला चावले तर त्यांच्या हाडांचाही चुरा होईल.

ब्रिटनमध्ये बंदी घालण्यात आलेला अमेरिकन बुली डॉग हा पाचवा कुत्रा आहे. याआधी पिटबुल टेरियर, जापानी टोसा, डोगो अर्जेंटिनो आणि फिला ब्रासीलीरो या कुत्र्यांवर सुध्दा बंदी घालण्यात आली आहे.

अमेरिकन बुली डॉगवर अनेक देशात बंदी आहे. भारतात मात्र या कुत्र्यावर बंदी नाही. भारतात या कुत्र्याची अंदाजित किंमत ३० ते ८० हजार रुपये इतकी आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.