पोलीस निरीक्षक मनिष पाटील यांच्याकडे बीड एलसीबीचा अतिरिक्त पदभार
1 min readबीड (प्रतिनिधी) – बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.सतिश वाघ यांची बदली झाल्यानंतर एलसीबीला कोणते अधिकारी येणार ? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.यामध्ये अनेकांची नावे चर्चेत आहेत. मात्र निर्णय झालेला नाही. त्यातच आज पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुर यांनी बीड एलसीबीचा अतिरीक्त पदभार वेल्फेअरचे पोलीस निरीक्षक मनिष पाटील यांच्याकडे सोपविला आहे तसेच वाहतूक शाखेचा पदभार एपीआय काळे यांना देण्यात आला आहे. दरम्यान बीड जिल्हा
पोलीस दलात मोठे फेरबदल होणार आहे.बीड जिल्हा पोलीस दलातील पाच पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत तर पाच नवीन पोलीस निरीक्षक जिल्हा पोलीस दलात येत आहेत. त्यामध्ये पो.नि.देविदास गात, शिवाजी बंटेवाड, संतोष खेतमाळस, अशोक मुदीराज, आजिनाथ काशिद यांचा समावेश आहे. हे पाच अधिकारी जिल्ह्यात दाखल होताच जिल्हांतर्गत पोलीस दलात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे.