मराठा योद्धा मनोज जरांगे पाटीलांची आकाश मोटर्सला सदिच्छा भेट ; मराठा महासंघातर्फे सत्कार
1 min readबीड:( प्रतिनिधी)- मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील सोमवारी बीड शहरात दौर्यावर असताना शहरातील प्रसिध्द कृषी उपकरणे विक्रते व मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब साळुंके यांच्या आकाश मोटर्स व कृष्णा पॉवर टिलर दुकानाला भेट दिली असता त्यांचा मराठा महासंघाच्या वतीने जल्लोषात स्वागतपर सत्कार करण्यात आला आहे.
बीड शहरातीलच नव्हें जिल्ह्यात प्रसिध्द असलेले कृषी उपकरणे विक्रेता आकाश मोटर्स व कृष्णा पॉवर टिलर लिमिटेड या दुकानाला मराठा आरक्षण योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी भेट दिली असता मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब साळुंके व महासंघाच्या सर्व पदाधिकार्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय युवा प्रतिनिधी किशोर गिराम पाटील, मराठवाडा उपाध्यक्ष नारायणराव थोरात, बीड जिल्हा कार्याध्यक्ष आदिनाथ पिंगळे पाटील, बीड जिल्हा सरचिटणीस भागवत बादाडे, बीड जिल्हा संघटक विलास सातपुते, बीड तालुका अध्यक्ष प्रकाश तात्या शिंदे, बीड शहर अध्यक्ष दत्ता शेळके पाटील, युवा उद्योजगक व सामाज सेवक संभाजी पवार, युवा उद्योजगक प्रसिद्ध सामाज नेते गोरख भाऊ शिंदे, तसेच मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.