नियोजित बालविवाह रोखण्यात बीड प्रशासनाचे यश
1 min readबीड (प्रतिनिधी) – बाल विवाह हा कायद्याने गुन्हा आहे . मात्र गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात बाल विवाहाचे प्रमाण वाढले आहे. तीन दिवसांपुर्वीच साक्षाळ पिंप्री येथील बालविवाह रोखल्यानंतर आज दुपारच्या मुहूर्तावर बीडच्या खडकपुरा भागात होणारा बालविवाह प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रोखला आहे. या बाबतीत अधिक माहिती अशी की
बीड शहरातील खडकपुरा भागात आज दुपारी १२.३० च्या सुमारास लग्न सोहळा आयोजीत करण्यात आला होता. मात्र हा बालविवाह असल्याची माहिती प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली. तेंव्हा तहसीलदार तथा आयएएस अधिकारी आदित्य जीवने, नायब तहसीलदार सुरेंद्र डोके, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सुधीर ढाकणे, पेठ बीड पोलिस ठाण्याचे पोउपनि आर.एस.पवार, सामाजिक कार्यकर्ते तत्वशिल कांबळे, सारिका यादव, स्वप्नील कोकाटे यांनी तात्काळ विवाहस्थळी धाव घेवुन नियोजीत वेळेआधी बालविवाह रोखला. या प्रकरणातील कार्यवाही दुपारी उशिरापर्यंत सुरू होती.