जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

11 February 2025

मुंबईत आमरण उपोषण करणार ; बीड येथील सभेत मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

1 min read

बीड : (प्रतिनिधी)- मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची आज बीडमधील सोलापूर रोड येथे इशारा सभा सुरु आहे. या सभेपूर्वी त्यांची शहरातून विराट रॅली पार पडली. यानंतर बीडच्या सभेला संबोधित करतांना मनोज जरांगे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मनोज जरांगे यांनी भुजबळ यांचा येवल्याचा येडपट असा उल्लेख केला. शांत असलेल्या मराठ्यांना डाग लागला असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.

नेमकं मनोज जरांगे काय म्हणाले?

बीड शहरात जिल्ह्यातील मराठ्यांचा महाप्रलय जमला आहे. आपण विराट ताकदीने जमला आहात त्यामुळे मराठा समाजाच्या चरणी नतमस्तक होतो, असं जरांगे म्हणाले. गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आलेल्या बांधवांना जय शिवराय म्हणत मनोज जरांगेंनी अभिवादन केली.

मराठा समाजाने शांतता काय असते ते पुन्हा सिद्ध केलं आहे. आपल्याला डाग लावला गेलाय, शांततेनं आंदोलन करणाऱ्या मराठ्यांना डाग लावला आहे. कोणी म्हणतं आमची घरं जाळलं, आमचं हॉटेल जाळलं पण तुम्हीच तुमची हॉटेल जाळली आणि निष्पाप मराठ्यांना गुतवल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला.

आपल्या पोरांनी काय न करताही गुन्हे लावले गेले. निष्पाप पोरांना गुतवण्याचं काम सरकारने केले आहे. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. सरकारने झोपू नये, मराठ्यांना राज्यात शांतता हवी आहे. मराठा समाज शांततेत मैदानात आला आहे, विनाकारण त्याला डाग लावू नका, असं मनोज जरांगे म्हणाले.

मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांचेच सरकार ऐकत असल्याचा दावा केला आहे. भुजबळ मराठ्यांच्या वाटाला कशाला जातात, असा सवाल मनोज जरागेंनी केला. मी लई नमुना बेक्कार असल्याचं जरांगेंनी म्हटलं.

गिरीश महाजन यांनी तुम्ही काही बोलू नका छगन भुजबळ यांना समज दिली असल्याचे सांगितल्याचे मनोज जरांगे म्हणाले. छगन भुजबळ यांना मराठा आरक्षण मिळाल्याने कचका दाखवतो. भुजबळ यांच्यात किती दम आहे हे बघायचे आहे, असंही जरांगे म्हणाले.

मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात कोण बोलला तर त्यांना सुट्टी देणार नाही. मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरु असल्याचे जरांगेंनी म्हटलं. मनोज जरांगे यांनी २० जानेवारी २०२४ ला मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याचीही घोषणा केली आहे.