जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला १३ जणांना चावा

1 min read

बीड: (प्रतिनिधी)- शहरातील गल्ली-गल्लीत मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून यामुळे नागरिकांना मोठ्या मुश्किलीचा सामना करावा लागत आहे. या मोकाट कुत्र्यांमुळे शहरात अपघातांची संख्या वाढली आहे. तसेच दररोज कित्येक कुत्र्यांने चावा घेतल्याचे घटना समोर येत आहे. दरम्यान शहरातील अनेक भागात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला आहे. काल दिवसभरात तब्बल १३ जणांना या कुत्र्याने चावा घेतला असुन यामध्ये अनेकजण जखमी देखील झाले आहेत. नगर पालिकेला अनेकवेळा विनवन्या करूनही नागरीकांची दखल घेतली जात नाही. किमान आतातरी नगर पालिका या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणार की नाही ? असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे. बीड शहरातील सुभाष रोड, धोंडिपुरा, बशीरगंज, बुंदेलपुरा, बलभिम चौक यासह इतर ठिकाणी काल दिवसभरात पिसाळलेल्या कुत्र्याने १३ जणांना चावा घेतला. त्यामुळे या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी संतोष शेळके, भारती जव्हेरी, फहाद बिन इरफान, मोमीन जुबेर, श्रावण लांडे, सचिन, सय्यद गौस, शिला लोहिया, खालीद अतार आदींनी मुख्याधिकार्‍यांकडे केली आहे.
या बाबतीत नगर परिषदेने लवकरात लवकर कठोर निर्णय घेऊन शहरातील नागरिकांना या मोकाट कुत्र्यांपासून सुरक्षित करावे अशी प्रतिक्रिया नागरिकांतून होत आहे.

Copyright © All rights reserved. | www.beedsamratnews.com Designed by www.WizInfotech.com.