एका अल्पवयीन विवाहित महिलेवर अत्याचार, पोलीसांनी घेतले मुख्य आरोपीला ताब्यात
1 min read![](https://beedsamratnews.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230717-WA0021-1024x869.jpg)
बीड (प्रतिनिधी) – एका १७ वर्षीय विवाहित महिलेवर तेथीलच तरूणाने पळवून नेवून बलात्कार केल्याची घटना बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरून दोघांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील एका १७ वर्षीय विवाहितेवर त्याच परिसरातील एका तरूणाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी आणि पिडितेची मार्च २०२३ मध्ये आपसात ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. सदरील तरूणाने दि.३मे २०२३ रोजी विवाहीतेला पळवून कल्याण येथे नेले. त्याठिकाणी तिच्यावर वारंवार अत्याचार केला. सदरील प्रकाराची सर्व माहिती तरूणाच्या भावाला देखील होती. मात्र या प्रकरणात पोलीसांनी कल्याण येथे जावून दि.१६ जुलै २०२३ रोजी पिडितेला बीडमध्ये आणल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पिडितेच्या तक्रारीवरून किशोर गोरख कांबळे आणि त्याचा भाऊ बाळू गोरख कांबळे (दोघे रा.हिरापुर) यांच्याविरूध्द बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम ३७६, ३७६(२), ३६६ (ए),१०९ भांदवीसह कलम ४, ६,८ ,१२,१७, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
◾पिंक पथकाने मुख्य आरोपीला घेतले ताब्यात◾
बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत विवाहीता बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली होती. त्याअनुषंगाने पिंक पथकाचे एपीआय अंतरप व त्यांच्या सहकार्यांनी तपास करून पिडितेला कल्याण येथून ताब्यात घेतले. यावेळी पोलीसांनी मुख्य आरोपी किशोर कांबळे यालाही अटक केली. दरम्यान पिडित विवाहिता ही अल्पवयीन असुन या संदर्भात पुढील कार्यवाहीसाठी हिंगोली या हिच्या मुळगावी अहवाल पाठवण्यात येणार असल्याचे एपीआय अंतरप यांनी सांगितले.