जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

13 February 2025

तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर ? चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडा ! – प्रार्थना बेहरे

1 min read

बीड सम्राट: आपल्या अप्रतिम अदाकारीने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी तसेच सिनेमा आणि टेलिव्हिजन मालिका विश्वातील एक लोकप्रिय चेहरा म्हणून सर्वांना परिचित असलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही समाजमाध्यमांवरही नेहमी सक्रिय असते.

या मनमोहक
अभिनेत्रीने अलीकडे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून टीव्ही विश्व गाजवले होते. या मालिकेत श्रेयस तळपदे आणि मायरा वायकुळ यांच्यासोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेषतः आवडली.

दरम्यान ही सुंदर अभिनेत्री तिच्या इन्स्टाग्राम पेजवर विविध फोटोशूट आणि व्हिडिओ शेअर करत असते. शिवाय ती अनेकदा तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये काही कोटही शेअर करते.

सध्या या अभिनेत्रीची लेटेस्ट इन्स्टाग्राम स्टोरी विशेष चर्चेत आली असून ज्यामध्ये तिने वजन कमी करण्याचा आणि प्रेमाचा कसा संबंध आहे याविषयी सांगितले आहे.

प्रार्थना बेहरे हीने एक कोट इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला असून त्यात असे म्हंटले आहे की, ‘तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर व्यायाम किंवा योग्य आहाराची आवश्यकता नाही किंवा गरज नाही.

त्यासाठी फक्त चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडा.’
अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर करताना स्माइली इमोजीही वापरले आहेत.

प्रार्थनाची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. त्यावर प्रेक्षकांमध्ये कमेंट्स करण्याची स्पर्धाच लागली आहे . बरंच प्रेक्षक म्हणताहेत प्रार्थना बेहरेचा सल्ला अगदी बरोबर आहे.

तर काहींचे विविध कमेंट्सही या विषयी येत असल्याने प्रार्थना बेहरे हीच्या चाहत्यांमध्ये गंमत रंगली आहे.