सी.ए.गोविंद बियाणी यांना १ वर्षाची शिक्षा.
1 min readधनादेश प्रकरण -न्यायालयाचा आदेश-
बियाणी यांनी साडेबावीस लाख रुपये नुकसानभरपाई द्यावे -अॅड.अविनाश गंडले
——————————————————————————
बीड (प्रतिनिधी) – सरकी पेंड खरेदी संदर्भात 11 लाख 40 हजार रूपये देवुनही सरकी पेंड दिली नाही. तर बाजार भावाप्रमाणे दिलेला धनादेश न वटल्यावरून दाखल प्रकरणात न्यायालयाने सी.ए.गोविंद रामविलास बियाणी यांना 1 वर्षाची शिक्षा ठोकत 22 लाख 50 हजार रूपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भात माहिती अशी की यातील तक्रारदार प्रकाश दत्तोपंत गोरकर यांनी सी.ए.गोविंद रामविलास बियाणी यांच्यासोबत 80 टन सरकी पेंड प्रती टन 14 हजार 100 रूपये प्रमाणे खरेदी करण्याचा तोंडी करार केला. त्याप्रमाणे हा करार वरद ऑईल इंडस्ट्रीज जे की बियाणी यांच्या पत्नीच्या नावे असुन या माध्यमातून हा करार झाला होता. या संदर्भात प्रकाश गोरकर यांनी गोविंद बियाणी यांना 27 मार्च 2014 रोजी 11 लाख 40 हजार रूपये दिले होते. सदर सरकी पेंड बियाणी हे वेळेत देवु शकले नाहीत. तेंव्हा बाजार भावाप्रमाणे प्रकाश गोरकर यांना सरकी पेंड देण्याचे मान्य केले होते. परंतु बियाणी यांनी सरकी पेंड दिली नाही. तेंव्हा बियाणी यांनी 18 हजार 750 नुसार 11 लाख 25 हजाराचा अॅक्सेस बँकेचा धनादेश बियाणी यांनी प्रकाश गोरकर यांना 1 जानेवारी 2015 ला दिला. तो धनादेश न वटल्याने गोरकर यांनी एस.सी.क्र.296/2015 नुसार न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. सदर प्रकरणात बियाणी व तक्रारदार प्रकाश गोरकर यांच्या साक्षी पुरावे होवून यात चौथे प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी अविनाश पाटील यांनी गोरकर यांचे म्हणने ग्राह्य धरत गोविंद रामविलास बियाणी यांना 1 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा व 22 लाख 50 हजार रूपये दोन महिन्यात भरपाई देण्याचे आदेशित केले. सदर प्रकरणात प्रकाश दत्तोपंत गोरकर यांच्या वतीने अॅड.अविनाश पंडित गंडले यांनी काम पाहिले. त्यांना अॅड.इम्रान पटेल, अॅड.बप्पा माने, अॅड.किरण मस्के,अॅड.गोवर्धन पायाळ,अॅड.सुरक्षा जावळे, अॅड.शुभम सरवदे, अॅड.राजाभाऊ बनसोडे, अॅड.राजेंद्र शिंदे यांनी सहकार्य केले.