नागरी आरोग्य वर्धनी केंद्र फोडले पेठ बीड पोलिसांनी लावला जलद गतीने तपास
1 min read
बीड – (प्रतिनिधी) शहरातील तेलगाव नका परीसरात असलेल्या नागरी आरोग्य वर्धनी केंद्र फोडून चोरट्यांनी केला ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
अधिक माहिती अशी की तेलगाव नाका परिसरात असलेल्या नागरी आरोग्य वर्धनी केंद्राचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८६ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे . चोरी गेलेल्या वास्तूत चेअर , तीन टेबल, दोन स्टुल ,एक अलमारी तसेच दवाखान्यातील इतर वस्तू ज्यांची अंदाजित किंमत ८६ हजार रुपये एवढी आहे. चोरुन नेलेला माल आरोपी विकण्याचे तयारीत असल्याची माहिती पोलिसांना खबरी कडून मिळताच पेठ बीड पोलिसांनी जलद गतीने कार्यवाही करून आरोपी शेख अख्तर (गांधी नगर)याला ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत केला.तसेच आरोपीला सहकार्या करणा-या शेख सोहिल यालाही ताब्यात घेण्यात आले.आरोपी कडून ३ लाख १६ हजार रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले.
सदरील कार्यवाही पो.अ. नंदकुमार ठाकूर, अप्पर पो.अ. सचिन पांडकर, उपविभागीय अधिकारी संतोष वाळके, यांच्या मार्गदर्शनाखाली पेठ बीड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रामचंद्र पवार,पोउपनि बब्रुवान गांधले,स.फौ.मुंजब्बा सौंदरमल ,पो.काॅ. सुभाष मोटे, बळीराम कातखडे,पो.ना. अजित शिक्केतोड ,पो.काॅ . विष्णू गुजर , औदुंबर गिरी, बिभीषण सांगळे , रमाकांत कोठावळे, गणपत पवार यांनी केली आहे.