जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

13 November 2024

बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा जमैतुल कुरैश संघटनेचा ऐतिहासिक निर्णय

1 min read

बीड (प्रतिनिधी)- या वर्षी आषाढी एकादशी आणि बकरी ईद (ईद-उल-अजहा) एकाच दिवशी येत आहे. त्या पार्श्वभुमीवर एकता, अखंडता आणि एकात्मतेची संस्कृती कायम रहावी. हिंदू-मुस्लीम ऐक्याची पताका सर्वदूर फडकत रहावी म्हणून हिंदू धर्मियांच्या भावनांचा आदर करत बीडमधील जमैतुल कुरैश सामाजिक संघटनेने आषाढी एकादशीमुळे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे हिंदू-मुस्लीम एकतेचे नाते अधिक बळकट झाले आहे. मुस्लीम समाजासह जमैतुल कुरैश संघटनेने घेतलेला हा आदर्श निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे.
बीड येथील मोमीनपुरा भागातील एका फंक्शन हॉलमध्ये आज दुपारी झालेल्या बैठकीत जमैतुल कुरैश संघटनेने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने. बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव कुर्बानी देतात तसेच आषाढी एकादशीला उपवास असतो. दोन्ही पवित्र सणांचा अनोखा संगम एकाच दिवशी आल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलीस व दोन्ही समाजापुढे होते. त्या अनुषंगाने बीडच्या जमैतुल कुरैश संघटनेने स्वत: पुढाकार घेत शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तींसोबत बैठक घेऊन या बैठकीमध्ये आषाढी एकादशीमुळे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे . या बैठकीस जमैतुल कुरैश संघटनेचे अध्यक्ष रफीकसेठ कुरेशी, मुफ्ती अब्दुल्लाह कुरेशी, जावैदभैय्या कुरेशी, हाजी इकबाल कुरेशी, आलीमसेठ कुरेशी, मुजीबसेठ कुरेशी, सत्तार कुरेशी, हाफीज जमील, खुर्शीद आलम , अ‍ॅड.शेख शफीकभाऊ, फारूक पटेल, अशफाक इनामदार, जैतुल्ला खान, शेख एजाज , इकबाल भाई, बरकत पठाण,यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.