जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

20 January 2025

बीडच्या एसटी महामंडळाचे सर्व्हर डाॅऊन

1 min read

बीड (प्रतिनिधी) सध्या मोठ्या प्रमाणात लग्नांच्या कार्यक्रमांचे वातावरण निर्माण झालेल्या आहेत. अशातच एसटी महामंडळाचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे.
आज सकाळपासून एसटी महामंडळाचे ॲटोमॅटीक जीपीआरएस तिकीट मशीनमध्ये सर्व्हर डाऊन दाखवत असल्यामुळे जवळपास ३० फेऱ्या रद्द करण्यात आले आहे.
ऐन गर्दीच्या वेळी एसटी महामंडळाने फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांमध्ये अस्वस्थता व संतापाची लाट पसरली आहे. सध्या एसटी बस स्थानकांत ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांची संख्या वाढली असून जेवढे बसेस महामंडळ फेऱ्या साठी वापरत आहे ते पण कमी पडत आहे त्यांतच अचानक फेऱ्या कमी केल्याने प्रवाशांना भर उन्हात अडचणीला सामोरे जावे लागत आहे. बीड एसटी महामंडळाने लवकरात लवकर पर्यायी व्यवस्था करावी अशी प्रतिक्रिया प्रवाशांमध्ये व्यक्त केल्या जात आहेत.