खडी क्रेशर धारकांनाही आता वाहतूक पास आवश्यक.
1 min readबीड (प्रतिनिधी) – वाळूच्या गाड्यांप्रमाणेच आता खडी क्रेशर धारकांनाही वाहनांसोबत वाहतूक पास आणि वाहनांना जीपीएस बंधनकारक करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामुळे आता खडी क्रेशर आणि दगडधारकांनाही या नियमांचे पालन करावे लागणार आहे.
बीड जिल्ह्यातील बहुतांश खडी क्रेशर व दगड खादान यांची मुदत संपुष्टात आलेली आहे. त्या अनुषंकाने ज्या खडी क्रेशर आणि दगड खादानींची मुदत संपली आहे. अशा खादान आणि क्रेशर बंद करून त्याचा अहवाल ४८ तासाच्या आत अप्पर जिल्हाधिकारी बीड आणि अंबाजोगाई यांना पाठवण्याच्या सुचना सर्व तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर खडी क्रेशर धारक वाहनांना वाहतूक पास आणि जीपीएस देखील बंधनकारक करण्यात आले आहेत.