जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

एक जुलैपासून विदेशात क्रेडिट कार्ड वापरल्यास भरावे लागणार २० टक्के कर

1 min read

नवी दिल्ली: (वृत्तसंस्था)विदेशात क्रेडिट कार्डांच्या साह्याने केलेल्या पेमेंटवर २० टक्के कर उगमाशी संकलित (TCS) केला जाणार आहे. असे करण्यापूर्वी क्रेडिट कार्डधारक त्याच्या कार्डाच्या आधारे नेमका कसा आणि कोणत्या गोष्टींसाठी खर्च करतो, याचा अंदाज प्राप्तिकर विभाग घेऊ इच्छित आहे. यासाठी क्रेडिट कार्डधारकांना येत्या काळात त्यांनी केलेल्या खर्चाचा तपशील कार्ड देणाऱ्या बँकेला, वित्तसंस्थेला द्यावा लागणार असून यांखेरीज विदेशी चलनात केल्या जाणाऱ्या खर्चाविषयी माहितीही विशिष्ट कालावधीत द्यावी लागणार असल्याची ही आहे.अशा प्रकारे बँकेव्यतिरिक्त प्राप्तिकर विभागाला क्रेडिट कार्डधारकांची खर्चाची माहिती मिळावी, यासाठी प्राप्तिकर विभाग रिझर्व्ह बँकेसोबत चर्चा करत असल्याची माहिती संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे. या बाबतीत डिक्लेरेशन किंवा तपशील भरून देण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. असा कालावधी क्रेडिट कार्डधारकाला देण्याचा; तसेच हा कालावधी निश्चित करण्याचाही विचार सध्या सुरू आहे. प्राप्तिकर विभाग लवकरच प्रत्येक व्यवहारासाठी कशाप्रकारे व किती दराने टीसीएस कापला जाईल, याचा तपशील वारंवार विचारले जाणारे प्रश्न अर्थात एफएक्यू स्वरूपात लवकरच प्रसिद्ध करणार आहे. हा टीसीएस एक जुलैपासून गोळा केला जाणार आहे. एक जुलैपासून टीसीएस कापता यावा यासाठी केंद्र सरकारने विदेशी चलन व्यवस्थापन कायद्यातील (फेमा) चालू खाते व्यवहार नियमांमध्ये सुयोग्य बदल केले. हे बदल करून विदेशात क्रेडिट कार्डाच्या साह्याने केल्या जाणाऱ्या व्यवहारांचा समावेश रिझर्व्ह बँकेच्या ‘लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम’अंतर्गत केला गेला असून एक जुलैपासून क्रेडिट कार्डाच्या साह्याने विदेशात केल्या जाणाऱ्या पेमेंटची रक्कम सात लाख रुपयांपेक्षा अधिक झाल्यास २० टक्के टीसीएस कापला जाईल. हा खर्च वैद्यकीय किंवा शैक्षणिक कारणांसाठी केला गेल्यास त्यासाठी ५ टक्के टीसीएस कापला जाणार आहे. विदेशातील शिक्षणासाठी सात लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचे शिक्षणकर्ज घेतले असल्यास त्यावर ०.५ टक्के टीसीएस कापण्यात येणार आहे. या कराची घोषणा चालू आर्थिक वर्षासाठी मांडल्या गेलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली होती. दरम्यान ह्या मागचे उद्देश क्रेडिट कार्डाचा वापर वैद्यकीय किंवा शैक्षणिक कारणांसाठी केला गेला आहे हे जाणून घेणे आहे.वैद्यकीय व शैक्षणिक कारणांसाठी वापर झाल्यास दोन टक्के सवलत देण्यासाठी.अन्य कारणांसाठी क्रेडिट कार्डाचा वापर विदेशात केला गेल्यास त्याची माहिती मिळून त्यावर २० टक्के टीसीएस कापून घेणे सोपे जाईल या उद्देशाने कार्डधारकांनी कोणत्या कारणाने कार्डाचा उपयोग केला हे जाणून घेणार असल्याचे सुत्रांनी दिलेल्या माहितीत नमूद आहेत.