जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

7 December 2024

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती चार ते पाच रुपयांनी घटणार

1 min read

नवी दिल्ली:(वृत्तसंस्था) निवडणूका जवळ येताच काही ना काही घोषणाबाजी होतंच असते. त्यातच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केवळ ४-५ रुपयाची कपात झाली असली तरी सर्वसामान्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आता जागतिक पातळीवर अशा बातम्या आल्याने पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची अपेक्षा वाढली असून ओएमसीच्या बॅलेन्स शीटमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे.२०२४ च्या आर्थिक वर्षात जबरदस्त नफा नोंदवण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. गेल्या एक वर्षाहूनही अधिक काळापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कसलाही बदल झालेला नव्हता. मात्र आता ऑइल Open in App न्या (OMC) पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करणार आहेत. याच वर्षाच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात काही राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्या (OMC) ऑगस्ट महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या दरात ४ते ५ रुपये प्रति लिटरची कपात करण्याची दाट शक्यता आहे.जेएम फायनान्शियल इन्स्टिट्यूशनल सिक्युरिटीजने एका रिसर्चमध्ये म्हटल्यानुसार, तेल कंपन्यांचे मुल्यांकन व्यवस्थित होताना दिसत आहे. मात्र, इंधन विपणन व्यवसायातील कमाईत मोठी अनिश्चितता आहे. ओपेक प्लसच्या (Opec+) मजबूत किंमतीमुळे पुढील ९ ते १२ महिन्यांत कच्च्या तेलाच्या किंमती वाढू शकतात. तसेच, क्रूड ऑइलची किंमत ८० डॉलर प्रति बॅरलच्या खाली राहील, असा तेल कंपन्यांना विश्वास आहे, मात्र हे, सरकारकडून होणाऱ्या आर्थिक वर्षाच्या अंडर- रिकव्हरच्या भरपाईवर अवलंबून असून नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात काही मुख्य राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांना ऑगस्टपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत ४ ते ५ रुपये प्रति लिटरची कपात करण्यास भाग पाडले जाऊ शकते. कारण, ओएमसीच्या बॅलेन्स शीटमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली असल्याचे स्पष्ट आहे. आर्थिक वर्ष २०२४मध्ये प्रचंड नफा नोंदवण्याची शक्यता आहे. एकंदरीत काही दिवसांनी पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी झाल्यास सर्वसामान्यांना नक्कीच आनंद होईल.