अवमान याचिकेत जिल्हाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाची नोटीस- नवनाथ शिराळे
1 min read
बीड: (प्रतिनिधी)- बीड शहरातील शिवाजीनगर ते आहेर धानोरा रोडच्या रूंदीकरणासाठी विना नोटीस, विना मोबदला ताबा घेवून रस्ता रूंदीकरण केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी, नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना अवमान याचिकेत नोटीस बजावली आहे.
नवनाथ शिराळे व गोरख शिराळे यांची १६ गुंठे जमिन शिवाजीनगर ते आहेर धानोरा रोड रस्ता रूंदीकरणासाठी विना नोटीस, विना मोबदला घेवून रस्ता रूंदीकरण करण्यात आला होता. मात्र २०१६ पासून मोबदला दिला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही मोबदला न दिल्याने शिराळे यांनी अॅड.चंद्रकांत व्ही.ठोंबरे यांच्या मार्फत अवमान याचीका दाखल केली होती. त्यात उच्च न्यायालयाने २६ जुन २०२३ रोजी जिल्हाधिकार्यांना व मुख्याधिकार्यांना नोटीस बजावली आहे . या प्रकरणाची पुढील सुनावणी दि.१७ जुलै २०२३ रोजी ठेवण्यात आली आहे. नोटीसद्वारे जिल्हाधिकारी, मुख्याधिकार्यांना उच्च न्यायालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचिकाकर्ते तर्फे अॅड.चंद्रकांत ठोंबरे व शासनातर्फे अॅड.सानप हे काम पाहत असल्याची माहिती नवनाथ शिराळे यांनी दिली आहे.