रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ
1 min read
अकोला: (प्रतिनिधी) राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने कहर केला असून तर काही जिल्ह्यांत अजून थेंब सुध्दा पडले नाही. त्यातच अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यातील माना रेल्वे स्थानकाजवळ भुयारी मार्गात पावसाचे पाणी घुसल्याने रेल्वे रुळाच्या खालचा भराव (खडी) वाहून गेल्याने रेल्वे वाहतूक सद्यःस्थितीत बंद करण्यात आली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेमुळे अकोला-नागपूर-भुसावळकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे.अकोला जिल्ह्यातील माना रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाच्या खालील मलमा वाहून गेल्याने रेल्वे वाहतूक गेल्या काही तासांपासून बंद आहे, ज्याचा हजारो प्रवाशांना फटका बसला आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय. माना रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या रेल्वे रूळाखालून वाहणाऱ्या नाल्याला देखील पूर आल्याने हा प्रकार घडला आहे. दरम्यान गस्तीवर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सध्या अकोला- नागपूर-भुसावळकडे जाणाऱ्या दोन्ही रेल्वे लाईनवरील रेल्वे वाहतूक सेवा ठप्प आहे. रेल्वे रूळ दुरुस्तीचे काम सुरू असल्याने रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरम्यान नागपूर-मुंबई मुख्य रेल्वे लाइन बंद आहे. अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर अनेक रेल्वे जागेवरच थांबवण्यात आले आहेत. दरम्यान, काही रेल्वे स्थानकावरच थांबविण्यात आल्या आहेत. या प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.अमरावती
-मुंबई, गोंदिया मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, शालिमार एक्स्प्रेस, हावडा मुंबई मेल ह्या आणि इतर गाड्यांची वाहतूक धीम्या गतीने सुरु आहेत. तर काही मेल गाड्या थेट रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या, दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. रिलीफ ट्रेन घटनास्थळी दाखल झाली आहे. येत्या काही तासांत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहेत.