छगन भुजबळांनंतर धनंजय मुंडे यांनाही जीवे मारण्याची धमकी
1 min read
बीड: (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात सध्या राजकीय घमासान सुरू असताना अजित पवार गटाच्या दोन मंत्र्यांना धमकी देणारे फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बाबतीत अधिक माहिती अशी की प्रशांत पाटील नावाच्या एका व्यक्तीने छगन भुजबळ यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली. सदर व्यक्तीने छगन भुजबळ यांची सुपारी मिळाली असल्याचे सांगत जीवे मारण्याची धमकी दिली होती. रायगडमधील महाडमधून त्या तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस तपासात त्या तरूणाने दारूच्या नशेत धमकी दिल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान बीड जिल्ह्यातील नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांनाही रात्री बारा वाजण्याच्या सुमारास एका व्यक्तीने लॅंडलाईन फोन करून जीवे मारण्याची धमकी देत पन्नास लाख रुपयांची मागणी केली. धनंजय मुंडे यांच्या परळी येथील पंढरी निवासस्थानी असलेल्या लॅंडलाईनवर फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली.. विशेष म्हणजे मला पन्नास लाख रुपये द्या… नाहीतर धनंजय मुंडे यांना जीवे मारेन अशी धमकी दिली. सदरील व्यक्तीच्या विरूद्ध परळीत वाल्मीक कराड यांनी तक्रार दिली असून अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे