शहरातील आमराई व धांडे गल्ली येथील मान्यता प्राप्त शाळांचे धानोरा रोड परिसरात अनाधिकृत स्थलांतर
1 min readबीड: (प्रतिनिधी)- गुरुवर्य भा.वा. सानप प्रा. विद्यालय बालेपीर आमराई व छत्रपती शाहू महाराज प्रा. विद्यालय धांडे गल्ली बीड या शाळेच्या अनाधिकृत स्थलांतर रद्द करण्याची मागणी विविध शाळांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या दोन्ही शाळा धानोरा रोड येथे अनुक्रमे राजयोग मंगल कार्यालय व वरद रेसीडेंसी जवळ अनाधिकृतपणे चालवण्यात येत आहेत. त्यामुळे श्री विवेकानंद विद्यामंदिर प्रा. बीड,यशवंत विद्यालय बीड,मथुराबाई पिंगळे विद्यालय बीड, शरदचंद्र विद्यालय बीड,माऊली प्रा. विद्यालय बीड,श्री विवेकानंद मा. विद्यामंदिर बीड,यशवंत मा.विद्यालय बीड, डॉ. भिमराव पिंगळे मा. विद्यालय बीड या शाळेच्या विद्यार्थी संख्या कमी होत असुन शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. वरील दोन्ही शाळांवर कारवाई करुन त्यांच्या मुळ ठीकाणी हलवण्याचे आदेश देवून सहकार्य करावे नसता नाविलाजास्तव न्यायालयात जावे लागेल असा ईशारा या शाळांनी दिला आहे. या सर्व शाळा धानोरा रोड परिसरात आहेत.
जिल्हाधिकारी बीड, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बीड,उपसंचालक औरंगाबाद,मा. संचालक पुणे यांना ही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आले असुन या बाबतीत लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.