जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

21 October 2025

अभिजीत गोरेचे घवघवीत यश

1 min read

बीड: (प्रतिनिधी) येथील चंपावती विद्यालयाचा विद्यार्थी अभिजीत दादासाहेब गोरे याने इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत तब्बल ९७.२०% इतके गुण घेत घवघवीत यश संपादन केले आहे.
इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल नुकताच लागला. यात चंपावती विद्यालयाचा विद्यार्थी अभिजीत दादासाहेब गोरे याने एकूण ५०० पैकी ४८३ गुण प्राप्त केले आहेत. अभिजीतला मराठी विषयात – ९३, संस्कृत – ९८, इंग्रजी – ८८, गणित ९७, विज्ञान – ९७ व सामाजिक शास्त्र या विषयात ९८ गुण मिळाले आहेत.  या यशाबद्दल अभिजीतचे वडील प्रा. दादासाहेब गोरे, आई मीना गोरे, बहीण वैष्णवी गोरे, सेवानिवृत्त तहसीलदार श्री. उगलमुगले साहेब, श्रीमती विजयमाला उगलमुगले, आनंद उगलमुगले, बाळासाहेब मुळे यांच्यासह मित्र परिवार व आप्तेष्टांनी अभिजीतचे अभिनंदन करत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. अभिजीतला पुढील शिक्षण वैद्यकीय क्षेत्रात घ्यायचे असून करीता तो लातूर येथील शाहू महाविद्यालयात दाखल झाला आहे.