जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

20 January 2025

आझाद उर्दू हायस्कूलचा ९३% निकाल

1 min read

आष्टी: (प्रतिनिधी) आष्टी येथील तंनजीमे तरक्की शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित शाळा आझाद उर्दू हायस्कूल आष्टीच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ दहावी निकाल ९३. ३३%लागला आहे यामध्ये शाळेतून प्रथम क्रमांकाने ८६.६०% घेऊन सय्यद नाज फातेमा उत्तीर्ण झाली आहे तर द्वितीय क्रमांक कुरेशी फातेमा रफिक हिने ८६.४०% घेतले असून तृतीय क्रमांक ८५.६०% मिर्झा अनाम आबेद याने घेतले आहे. तसेच विशेष प्राविण्यासह ९ विद्यार्थी तर प्रथम श्रेणीत ४ द्वितीय श्रेणीत २ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.शाळेला या मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल व उत्कृष्ट गुण घेऊन पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून शाळेच्या याही वर्षीचा निकाल गेल्या वर्षाप्रमाणे लागला असून शाळेने निकालाची यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे .याबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण सभापती नियामत बेग, मिर्झा उबेद बेग, सय्यद शहाबुद्दीन, मिर्झा अस्लम बेग , प्रा. शहाणा बाजी ,प्रा. शेख अख्तर, महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा पत्रकार जावेद पठाण, आझाद उर्दू शाळेचे मुख्याध्यापक फारोकी सर , मिर्झा हशमतुल्ला बेग, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका नसरीन बाजी, शाळेतील सहशिक्षक सय्यद शफी ,प्रा. मोहसीन चाऊस, सय्यद अजीम, सय्यद रूकय्या बाजी, तबस्सुम बाजी,फरीदा बाजी, तकी सर ,बब्बू सर, शेख तय्यब भाई ,व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले या उत्कृष्ट निकालाबद्दल शाळेचे परिसरातून कौतुक होत आहे.