जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

MRF टायर बनले भारतातील सर्वात महागडे स्टाॅक

1 min read

मुंबई: (वृत्तसंस्था) भारतातील टायर कंपनीत सर्वात मोठी कंपनी MRF ने मंगळवारी नवीन विक्रम निर्माण केला आहे. एक लाख प्रति शेअरची किंमत ओलांडून MRF टायर भारताचा पहिला स्टॉक बनला असून मंगळवारी भारतीय शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहार सत्रात बीएसईवर MRF शेअर १.३७% उसळी घेत ५२ आठवड्यात १००,३०० रुपये किंमतीचा नवीन उच्चांकावर पोहोचला आहे. या आधी मे महिन्यात शेअरला विक्रमी उच्चांक गाठण्यासाठी प्रति शेअर फक्त ६६.५० रुपये कमी पडले होते. मात्र ८ मे २०२३ रोजी MRF शेअर्सनी फ्युचर्स मार्केटमध्ये महत्वाची पातळी ओलांडली आहे. MRF टायर हे देशातील सर्वात महागडा स्टॉक असून या यादीत हनीवेल ऑटोमेशन दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीच्या शेअरची किंमत ४१ हजार १५२ रुपये आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर पेज इंडस्ट्रीज, श्री सिमेंट, 3एम इंडिया, नेस्ले इंडिया आणि बॉश कंपनीचा नंबर लागतो.
बाजारात स्टॉक स्प्लिटमुळे कोणत्याही स्टॉकची किंमत कमी होऊ शकते परंतु MRF ने आतापर्यंत कधीही आपला स्टॉक स्प्लिट केला नाही. चेन्नईस्थित कंपनीचे एकूण ४२,४१,१४३ शेअर्स आहेत, यापैकी ३०,६०,३१२ शेअर्स सार्वजनिक भागधारकांचे आहेत. अशाप्रकारे, कंपनीचे ७२.१६% हिस्सेदारी सार्वजनिक भागधारकांकडे असून प्रवर्तकांकडे ११,८०,८३१ शेअर्स आहेत, जे एकूण इक्विटी शेअर्सच्या २७.८४% इतके आहे. लक्षात असू द्या गेल्या तीन महिन्यांत सदरील शेअर्सच्या किंमतीत २०% वाढ झाली होती.