जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

22 October 2025

त्या व्यक्तीचा वडवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांनी केले सत्कार

1 min read

वडवणी: (प्रतिनिधी)- वडवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमन शिरसाट यांनी नुकतेच एका तरुणाने केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत कौतुक करून वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यथोचित सत्कार केला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की वडवणी पोलीस ठाण्याला नुकतेच पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक यांनी वडवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटने बद्दल ज्या युवकाने माहिती देऊन सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवला त्या युवकाचे कुठेतरी कौतुक व्हावे या हेतूने आणि जेणेकरून समाजहिताच्या कार्यांत युवक वर्ग सामील होऊन या सामाजिक कार्यात योगदान देतील. या उद्देशाने वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये त्या जागरूक युवकाचा यथोचित सत्कार करून त्याला गौरविण्यात आले आहे. शहरापासून जवळच असलेल्या चिंचवण- धारुर रोडवर रेणुका माता मंदिराजवळ अगदी रस्त्याच्या कडेला दिनांक ४/७/२०२३ रोजी मंगळवारी रात्री ११ ते ११:३० वाजण्याच्या दरम्यान एका ५५ वर्षे वयाचा इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने या मार्गावरून आपल्या खाजगी वाहनाने प्रवास करणारा ऋतुराज महेंद्र वाघमारे या युवकाने वडवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमन शिरसाठ यांना तात्काळ भ्रमणध्वनी व्दारे संपर्क साधून या घटनेची माहिती दिली. अत्यंत तत्परतेने पोलीस निरीक्षक अमन शिरसाठ यांनी एएसआय जायभाये,राम शिनगारे आदि कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि त्या बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या पहाडी पारगाव येथील सतिश दामोधर मुंडे वय वर्षे ५५ यास पोलिसांच्या गाडीत टाकून तातडीने उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले आणि त्या व्यक्तीचा जीव वाचला .आज सतिश मुंडे हे अगदी ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे ऋतुराज महेंद्र वाघमारे या युवकाच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक अमन शिरसाट यांनी त्याचा पोलीस स्टेशन मध्ये शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व पुढील सामाजिक उपक्रमासाठी पाठबळ दिले. यावेळी फौजदार प्रमोद यादव,डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष विनायक जाधव, पत्रकार महेश सदरे, पत्रकार अतुल जाधव, पत्रकार अर्जुन मुंडे, पत्रकार वाजेद पठाण त्याच बरोबर वडवणी पोलीस ठाण्यातील कार्यरत सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.