जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

21 October 2025

ट्वीटर देणार आता वापरकर्त्यांना पैसे

1 min read

नवी दिल्ली: (प्रतिनिधी)- जर ट्वीटरकडून तुम्हाला पैसे मिळत असतील तर. विचार करा ? कारण एकीकडे ब्लू टिकसाठी पैसे आकारण्यास ट्वीटरने सुरुवात केली असून आता ट्वीटरच तुम्हाला पैसे देणार? ऐकायला थोडं विचित्र वाटतंय पण असं होणार आहे. ट्वीटर काही निवडक वापरकर्त्यांसोबत जाहिरातीमधील होणाऱ्या उत्पन्नातून काही रक्कम देणार आहे. म्हणजेच ऍड रेव्हेन्यू शेअर करण्यास सुरुवात करणार आहे. म्हणजेच आता क्रिएटर्सना ट्वीटरवरुनही पैसे कमावता येणार आहेत. दरम्यान याचा लाभ घेण्यासाठी वापरकर्ते, क्रिएटर्स यांना जाहिरात महसूल शेअरिंग आणि क्रिएटर्स सबस्क्रिप्शनसाठी साइन अप करावे लागेल. पण भारतीय युजर्ससाठी मात्र ही सेवा अद्याप लागू केली नसून ट्वीटरने दिलेल्या माहितीनुसार हे क्रिएटर्सना मिळणारा जाहिरातीतील फायदा हे सर्व देशांमध्ये उपलब्ध असेल जेथे स्ट्राइप पेमेंट सपोर्टेड आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की भारतातील वापरकर्त्यांसाठी ही सुविधा अद्याप उपलब्ध नाही. पण सोशल मीडिया फर्म ट्वीटर पुढे जाऊन या धोरणात सुधारणा करण्याचा विचार करू शकते. लाखो रुपये कमावण्याची संधी
नुकत्याच एका ट्वीटद्वारे समोर आली आहे की लोकप्रिय YouTuber मिस्टर बीस्ट (जेम्स डोनाल्डसन) ने जाहिरात शेअरिंग कमाईतून $25,000 म्हणजेच सुमारे २१ लाख भारतीय रुपये कमावले आहेत. त्याच वेळी, अनेक वापरकर्त्यांना देखील ५ लाखांपेक्षा अधिक रक्कम मिळाली आहे. त्याच वेळी, आणखी एका वापरकर्त्याला $ 3,899 म्हणजेच सुमारे ३.१ लाख रुपये मिळाले आहेत. एका ब्लॉग पोस्टमध्ये, Twitter ने उघड केले की जाहिरातीतून मिळणारा हा रेव्हेन्यू सध्या ठराविक युजर्ससाठी आहे. यासोबतच ऍड रेव्हेन्यू शेअरिंगसाठी अर्ज प्रक्रियेसाठी लवकरच पोर्टल किंवा पेज उपलब्ध करून देण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. एलन मस्क यांनी पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये या कार्यक्रमाची घोषणा केली होती . यासोबतच महत्त्वाचं म्हणजे एलन मस्क स्वतः ॲड रेव्हेन्यू शेअरिंग प्रोग्रामसाठी देखील पात्र आहेत. कारण त्यांचे प्रोफाईलही व्हेरिफाईड आहे. सध्या भारतीय युजर्सना या सुविधेचा फायदा नसला तरी भविष्यात ट्विटर भारतीय वापरकर्त्यांसोबत ॲड रेव्हेन्यूचा फायदा नक्कीच शेअर करेल.