बीड पोलिस निद्रावस्थेत.,चोरटे मात्र ‘जागते रहो’
1 min read
बीड (प्रतिनिधी) – बीड शहर आणि परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील एका सेवानिवृत्ताचे घर फोडून चोरट्यांनी 2 लाख 39 हजार 498 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला तर शिवाजीनगर हद्दीतही दोन ठिकाणी चोर्या झाल्या आहे . पिंपळनेर आणि बीड ग्रामीण हद्दीतही दोन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून
बीड शहरातील सेवानिवृत्त शेषेराव हिवराळे यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एकुण 2 लाख 39 हजार 498 रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. शिवाजीनगर हद्दीत मिलींद मधुरकर चिंचपुरकर यांच्या घरातून 85 हजारांचे दागिने लंपास केले तर शिवाजीनगर हद्दीतील शाहु नगर भागातील सुभाष अशोक ठोंबरे या सलुन व्यवसायीकाच्या घरातून 25 हजार रूपये किंमतीच्या दोन बॅट अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या. बीड तालुक्यातील पिंपळनेर जवळील बोरदेवी येथील विजय नारायण तांगडे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून 1 लाख 84 हजार 250 रूपयांचे दागिने लुटले तर बीड ग्रामीण हद्दीतील आहेर चिंचोली येथील दत्तात्रय बाजीराव बहीर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 1 लाख 8 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. वरील सर्व चोरीच्या घटना पाहता बीड पोलिस निद्रावस्थेत असल्याचे दिसून येते.