नवीन संसद भवनामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नवा ड्रेस कोड
1 min readनवी दिल्ली: (वृत्तसंस्था)- भव्यदिव्य स्वरूपात निर्माण झालेल्या नव्या संसदेतील सगळ्या कर्मचाऱ्यांना नवी कपडे मिळणार आहेत. एका हिंदी सांकेतिक स्थळाने दिलेल्या माहितीनुसार, गणेश चतुर्थीच्या दिवशी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
त्यादिवशी तिथं विधीनुसार पूजा केली जाणार आहे. पूजा संपल्यानंतर प्रवेश केला जाणार आहे. १८ सप्टेंबरला जुन्या संसद भवनात बैठक होईल. त्या दिवशी पहिली संसद निर्माण कशी केली, तेंव्हापासून आतापर्यंतची चर्चा केली जाईल.
विधीवत पूजा केल्यानंतर नव्या संसद भवनमध्ये प्रवेश केला जाणार आहे. त्यावेळी दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक सुध्दा होण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसद भवनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नवा पोषाख मिळणार आहे. तो नवा पोषाख NIFT यांच्याकडून तयार करण्यात आला आहे.
सचिवालयातील कर्मचाऱ्यांना बंद गळ्याचा सूटमध्ये बदल करुन गुलाबी रंगाचे नेहरु जॅकेट देण्यात येणार आहे. त्याचे शर्ट सुध्दा गुलाबी रंगाचे असतील. त्या शर्टवर कमळाचे फूल असेल आणि खाकी रंगाची पॅन्ट देखील असेल, सांगितले जात आहे की, दोन्ही सदनातील सदस्यांसाठी सुध्दा मार्शल ड्रेस सुध्दा बदली केला जाऊ शकतो, ती लोकं मणिपुरी पद्धतीची पगडी घालतील.
त्याचबरोबर संसदेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची सुध्दा वेशभूषा बदलण्यात येणार आहे. आतापर्यंत त्यांनी सफारी सूट घातला आहे, परंतु त्यांना आता सैनिकांप्रमाणे ड्रेस देण्यात येणार आहे.
१८ ते २२ सप्टेंबरला विशेष सत्र.
केंद्र सरकारने १८ ते २२ सप्टेंबरला संसदेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार त्या अधिवेशनात सरकार संसदेत एकाचवेळी एक देश एक निवडणुकीचे बील पास करण्याची शक्यता आहे. संसदेत विशेष अधिवेशन बोलवण्यात आल्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवरती जोरदार टीका केली आहे. त्याचबरोबर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान यांना पत्र देखील लिहीले आहे. या सर्व प्रकारामुळे विरोधक आक्रमक पवित्रा घेत आहेत.