आयजी ज्ञानेश्वर चव्हाण यांची बीड शहर पोलिस ठाण्याला भेट
1 min readबीड ( प्रतिनिधी) आज दुपारी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. यावेळी त्यांच्या समवेत पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, डीवायएसपी संतोष वाळके उपस्थित होते.आयजी चव्हाण यांनी शहर पोलिस ठाण्याची पाहणी करून कामगिरीचा आढावा घेतला.शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवि सानप यांच्याशी चर्चा करून दिशानिर्देश दिले आहेत.