जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

13 November 2024

मोफत आधार कार्ड अपडेट करा. मुदत पंधरा जून पर्यंत

1 min read

वृत्तसंस्था : आधार कार्डामध्ये आता काहीही अपडेट करण्या करीता पैसे आकारले जाणार आहेत. जर नाव, पत्ता, जन्मतारीख किंवा मोबाईल नंबर मोफत बदलायचा असेल किंवा अपडेट करायचा असेल तर तुमच्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत. १५ जूनपर्यंतच अपडेट करण्याची वेळ दिली जाणार असून मुदतीनंतर पैसे आकारले जाणार आहेत. त्यामुळे आधारमध्ये तपशील अपडेट करणे यापुढे विनामूल्य असणार नाही. UIDAI ने आपल्या संकेतस्थळावर ही माहिती दिली आहे. आधार च्या सुरुवातीपासून UIDAI च्या वेबसाइटवरून आधार कार्डचे तपशील विनामूल्य अपडेट करू शकत होतो. पण आता यासाठी पैसे आकारले जाणार आहेत.
UIDAI च्या संकेतस्थळाने कळविले आहे की आधार कार्डधारकांनी १५ जून २०२३ पूर्वी आधार घरबसल्या मोफतपणे अपडेट करू शकतात. मात्र १५ जून नंतर कोणत्याही प्रकारची माहिती अपडेट करण्यासाठी लोकांकडून पैसे आकारले जाणार असून शुल्क किती असेल याबाबत अधिकृत माहिती नाही. सेवेनुसार अपडेट फी आकारली जाईल. विनामूल्य अपडेट करण्या करीता UIDAI च्या वेबसाइटवर जा. आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाने लॉग इन करा. तुम्हाला जे काही तपशील अपडेट करायचे आहेत. त्या सेवेवर क्लिक करा
यानंतर तुमची माहिती भरा. तुमच्या माहितीची पडताळणी करण्यासाठी सहाय्यक कागदपत्रे जोडा. त्यानंतर काही दिवसांनी तुमची माहिती ऑनलाइन अपडेट होईल.आधार कार्डात तुम्ही जे काही बदल केले , ते पुन्हा एकदा पडताळा कारण नंतर पुन्हा तुम्हाला त्रास होवू नये. स्वतः केले जाणारे बदल योग्य असले पाहिजेत आणि व्यक्तीच्या फॉर्ममध्ये योग्य कागदपत्रे सोबत जोडलेली असणे आवश्यक आहे. आवश्यक माहिती इंग्रजी किंवा स्थानिक भाषेत प्रविष्ट करावी
आधार कार्ड माहिती दुरुस्त करताना, हे सुनिश्चित करावं की URN सुरक्षित आहे .कारण .जर कार्डधारकाकडे नोंदणीकृत फोन नंबर नसेल, तर आधार कार्ड दुरुस्त करण्याची ऑफलाइन पद्धत वापरावी.नाव बदलताना तशा बऱ्याच गोष्टी लागतात. अनेकदा चूकीचं प्रिंट झालेलं नाव बदलावं लागतं. काही जण लग्नानंतरही नाव बदलतात. पण ही प्रोसेस करतान इतरही महत्त्वाचे कागदपत्रे लागतात. यामध्ये खासकरुन पासपोर्ट, पॅन कार्ड, राशन कार्ड, वोटर आयडी अजून बरेच कागदपत्रे लागत आहेत.