आज केरळमध्ये मान्सूनचे आगमन; सोळा जून पर्यंत महाराष्ट्रात दाखल होईल.
1 min readमुंबई : सर्वांसाठी आनंद व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आज केरळमध्ये मान्सून चे आगमन झाले असल्याचे भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मान्सून बाबत मोठी अपडेट दिली आहे. आज ८ जून पासून मान्सून सुरू होत असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. दरवर्षी १ जून रोजी मान्सूनचे आगमन केरळमध्ये होत असते, यावर्षी तब्बल ७ दिवस उशिराने मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. नैऋत्य मोसमी पाऊसाने मान्सूनची सुरुवात झाली असल्याचे संबंधित विभागाने सांगितले आहे.मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र आणि मध्य अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात सुरु आहे. केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन भाग, मन्नारचे आखातात मान्सून दाखल झाला तसेच महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन १६ जून पर्यंत होईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आज केरळमध्ये सर्वच भागात पाऊस सुरु झाला आहे. दरवर्षी एक जूनला मान्सूनचे आगमन होत असते यावर्षी तब्बल सात दिवस उशिराने केरळात मान्सून दाखल झाला तसेच महाराष्ट्रात येइपर्यंत साधारणतः सात दिवस लागतात. म्हणजेच १६ जून पर्यंत महाराष्ट्रात आगमन होईल असे भा.ह.वि.यांचे अंदाज आहेत.