जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

अमेरिकन चौकशीमुळे गौतम अदानी अडचणीत, दहा पैकी दहा शेअर्स घसरले

1 min read

नवी दिल्ली: (वृत्तसंस्था) अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी सध्या मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.अमेरिकन रिसर्च फर्म हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबतच्या केलेल्या रिपोर्टला पाच महिने उलटून गेले, मात्र तरीही हिंडेनबर्ग काही अदानींना सोडत नसून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गौतम अदानींच्या कंपन्यांवर सतत नजर ठेवली जात आहे. त्यामुळे आता अदानी कंपनी नव्या अडचणीत सापडली आहे. अदानींच्या बड्या गुंतवणूकदारांना सध्या अमेरिकेत चौकशीला सामोरे जावे लागत आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, न्यूयॉर्क ब्रुकलिनचे अमेरिकेचे वकील कार्यालय अदानी समूहाच्या प्रमुख समभागधारकांची चौकशी करत आहे. अमेरिकेत अदानीच्या गुंतवणूकदारांवर पाळत ठेवली जात असल्याने अदानींचे शेअर्स कोसळले आहेत. अदानींचे १० पैकी १० शेअर्स घसरले असून या शेअर्सच्या घसरणीमुळे कंपनीला एका झटक्यात ५२,००० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.२४ जानेवारी रोजी हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत अनेक खुलासे केले होते. यानंतर, अदानी समूहाने गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी परदेशात रोड शो करुन सर्व काही सुरळीत करण्याचे असफल प्रयास ही केले.यांतच पुन्हा एकदा अदानींना मोठा झटका बसला आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होल्डिंग असलेल्या बड्या गुंतवणूकदारांची आता चौकशी केली जात आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन अदानी समूहात गुंतवणूक करणाऱ्यांवर चौकशी करत आहे.हिंडनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अदानी समूहाने गुंतवणूकदारांना कोणती माहिती दिली आहे हे तपासण्यासाठी तपास यंत्रणा प्रयत्नशील आहे.अदानींच्या कंपन्यांची भारतात आधीच चौकशी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अदानींच्या कंपन्यांवर देखरेख वाढवण्यात आली आहे. सेबी अदानींच्या कंपन्यांची चौकशी करत असून सेबीने चौकशी पूर्ण करण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. महत्त्वाचे म्हणजे, हिंडनबर्गने अदानींच्या कंपन्यांवर शेअर्समध्ये फेरफार आणि अकाउंटिंग फसवणुकीचा आरोप केला आहे.अमेरिकेतील गुंतवणूकदारांच्या चौकशीची बातमी येताच अदानींच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण झाली आहे. अदानी एंटरप्रायझेसमधील ६ टक्के तर अदानी ट्रान्समिशनमधील ५ टक्क्यांसह अदानीच्या सर्व दहा कंपन्यांचे शेअर्स घसरले आहे. त्यामुळे अदानी समूहाला मोठा फटका बसला आहे.