आज सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात वाढ
1 min readनवी दिल्ली: (वृत्तसंस्था)आज सोमवारी सोने महागले असून सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सोने आणि चांदीच्या खरेदीदारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मागील आठवड्यात सोने-चांदीच्या किंमतीत गिरावट पाहाण्यात आली होती. अमेरिकेत महागाई नियंत्रणात आल्यामुळे देशाची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणतीच वाढ केली नसल्याने, ज्याचा परिणाम सोन्यावर झाला आणि किंमती खाली आल्या. मात्र, आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी सोने आणि चांदीच्या किंमतीत दरवाढ नोंदवली गेली आहे. देशांतर्गत फ्युचर्स बाजारात सोने आणि चांदी महागली आहे.जागतिक सराफा बाजारातील चमक पाहता भारतीय बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात जोरदार उसळी पाहायला मिळत असून एमसीएक्सवर सोन्याचा भाव १२८ रुपयांनी महागला आहे. देशांतर्गत फ्युचर्स मार्केटमध्ये १० ग्रॅमची किंमत ५८ हजार ४३५ रुपये दराने ट्रेडिंग होत असताना एमसीएक्सवर चांदीची किंमतही सुमारे ८५० रुपयांनी महागली असून एक किलोचा भाव ६८ हजार ९२४ रुपये दराने ट्रेंड करत आहेत. दुसरीकडे, सराफा बाजारतही सोन्या आणि चांदीच्या दरात किंचित वाढ नोंदवली गेली आहे. २२ कॅरेट सोने १०० रुपये प्रतितोळा वाढून ५४ हजार ३५० रुपये तर २४ कॅरेट सोने ५९ हजार २८० रुपये दराने उपलब्ध आहे. तसेच चांदी एक किलो चांदी ७०,९०० किंमतीने विकली जात आहे. लक्षणीय आहे की मागील सप्ताहात सोने आणि चांदीच्या दरात जबरदस्त घसरण झाली असल्यामुळे जर तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही लगेच सुरूवात केली पाहिजे.आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असून कोमॅक्सवर सोन्याची किंमत प्रति औंस $१,९३६ वर ट्रेंड करत असताना चांदी देखील सुमारे २% मजबूतीसह $२३ च्या जवळ व्यवहार करत असून कोमॅक्सवरील किंमत प्रति औंस $२२.७७ वर व्यापार करत आहे. यामुळे गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात २% आणि चांदीच्या दरात ७.५ टक्क्यांची साप्ताहिक घसरण नोंदवण्यात आली होती. त्यामुळे सोन्या-चांदीच्या किंमती तीन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत. एकंदरीत सोने – चांदीच्या भावात अजून ही वाढ होण्याची शक्यता आहे.