अशोक हिंगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वजना इतक्या शालेय वह्यांनी करण्यात आली तुला
1 min readबीड: (प्रतिनिधी)- आतापर्यंत राजकीय क्षेत्रामध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या तुला पाहिल्या असतील. यात कोणी पेढ्याची तुला केली तर कोणी हारांची तर कोणी विविध गोष्टींच्या तुला केल्या. मात्र बीडमध्ये वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांची शालेय वह्या पुस्तकांची तुला हे आज बीडमध्ये चर्चेचा भाग ठरली आहे.
राजकीय क्षेत्रातील मंडळींचा वाढदिवस म्हटलं की मोठमोठाले बॅनर मोठमोठाले क्रेन वरील हार,रहदारीला अडचण ठरणारे मोठ मोठ्या बॅनर्स , फटाक्यांची आतिषबाजी डी.जे. या गोष्टीतून हे राजकीय मंडळींचे वाढदिवस साजरे केलेले आपण पाहिले मात्र कोणताही दाम डोलारा न करता वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांचा वंचित पदाधिकारी यांनी आदर्श ठरणारा असा वाढदिवस साजरा केला आहे. या वाढदिवसात तुला करण्यात आलेल्या वह्या गरजवंत होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांसाठी वाटप करून हा वाढदिवस साजरा केला आहे यामध्ये बीड जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील अनेक नेते अभिष्टचिंतन सोहळ्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते यात माजी आ.राजेंद्र जगताप,माजी आ.जनार्धन तुपे, शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे,ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप,जेष्ठ नेत्या प्रा.सुशीला मोराळे रिपाइं चे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख गणेश उगले, सीए बी.बी.जाधव संपादक नरेंद्र कांकरिया, दिलीपराव खिस्ती,वैभव स्वामी, विजयकुमार वाव्हळ,नगर सेवक रमेश चव्हाण,शहर प्रमुख सुनील सुरवसे,जि.प.सदस्य प्रकाश कवठेकर,अविनाश नाईकवाडे,अनिल घुमरे सुभाष सपकाळ,अशोक वाघमारे,भाऊसाहेब डावकर राहुल वायकर,अशोक सुखवसे,राजु महुवाले विठ्ठल बहीर, मीरा डावकर, मनिषा कोकाटे, श्रुती कानडे,छाया लांडगे, सारिका गायकवाड, अँड.अनिता चक्रे, नंदा भंडारे, सुरेखा जाधव, नयना भाकरे,सह अनेक सामाजिक,राजकीय पदाधिकारी सह वंचितचे सर्व आजी माजी व महिला पदाधिकारी त्या मध्ये शहर तालुका जिल्हा व युवक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. ही अनोखी तुला पाहण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती आणि सध्या या तुलेचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.