जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

भारत – पाकिस्तान सामन्याची तारीख अनिश्चित , या तारखेला होऊ शकतो सामना !

1 min read

नवी दिल्ली: (वृत्तसंस्था)- भारत- पाकिस्तानचा २०२३ मध्ये होणाऱ्या सामन्याची तारीख बदलण्याची शक्यता असून बीसीसीआय आणि आयसीसीने गेल्याच महिन्यात या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर केले होते. या वेळापत्रकानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत १५ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार होती.

मात्र सुरक्षा यंत्रणांनी १५ तारखेपासून नवरात्र सुरू होणार आहे आणि एकाच वेळी नवरात्र उत्सव आणि मॅचसाठी सुरक्षा देणे अवघड असल्याचे सांगत या सामन्याची तारीख बदलण्याचा सल्ला दिला होता.विविध माध्यमातून आलेल्या रिपोर्ट्स आणि बीसीसीआयमधील एका सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत १५ ऑक्टोबरला होणार नाही हे जवळ जवळ निश्चित झाले आहे. आता या लढतीची नवी तारीख समोर आली असून ही मॅच १४ ऑक्टोबरला होऊ शकते. पण १४ तारखेला मॅच खेळवणे देखील तितके सोपे असणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत १५ ऐवजी १४ ऑक्टोबरला होऊ शकते. अर्थात याची अधिकृत घोषणा झालेली नाही.

१४ ऑक्टोबरला मॅच होण्यात सर्वात मोठी अडचण म्हणजे या दिवशी नियोजित वेळापत्रकानुसार आधीच दोन मॅच आहेत. पहिली मॅच सकाळी १० वाजता चेन्नईत न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यात तर दुसरी मॅच दुपारी २ वाजता इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. एका दिवशी तीन मॅच म्हणजे प्रसारण करणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होईल. लोक एकावेळी एकच मॅच पाहू शकतील. या स्पर्धेत ट्रिपल हेडर नाहीत. त्यामुळे १४ ऑक्टोबरला मॅच खेळवण्यासाठी ब्रॉडकास्टर्सना तयार करणे सोपे असणार नाही. इतकेच नाही तर पाकिस्तान संघाचा विचार केला तर १२ ऑक्टोबर रोजी त्यांची श्रीलंकेविरुद्ध हैदराबाद येथे मॅच होणार आहे. ही मॅच रात्रीपर्यंत चालेल आणि पुन्हा १४ तारखेला त्यांना भारताविरुद्ध मॅच खेळावी लागले. पाकिस्तान संघासाठी हे सोपे असणार नाही. बीसीसीआय समोर सर्वात मोठे आव्हान असेल ते पाकिस्तानला तयार करणे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात भारतात अनेक मोठे उत्सव आणि सण असतात. २३ ऑक्टोबरपर्यंत नवरात्र आहे. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये दिवाळी आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान मॅचची तारीख बदलणे बीसीसीआयसाठी आव्हानात्मक असेल. या मॅचसाठी चाहते विदेशातून येत असतात आणि प्रेक्षकांच्या संख्येत अधिक प्रमाणात वाढ होत असते.