जाहिरात व बातमीसाठी संपर्क- +91-98346 60987

13 November 2024

मुस्लिम विद्यार्थ्याला मारायला लावणाऱ्या ‘ त्या ‘ महिला शिक्षिकेवर होणार कारवाई

1 min read

लखनऊ: (वृत्तसंस्था)- उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये एका समाजकंटक महिला शिक्षिकेने मुस्लिम विद्यार्थ्याला थोबाडीत मारायला लावल्या. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे विशिष्ट समाजामध्ये तीव्र संतापाची प्रतिक्रिया उमटत आहे .

सदरील व्हिडीओमध्ये एक समाजकंटक शिक्षिका हिंदू विद्यार्थ्यांना बोलावून मुस्लिम विद्यार्थ्याच्या थोबाडीत मारायला सांगत असल्याचे दिसते. शिक्षण विभागाने व्हायरल व्हिडीओची दखल घेत शिक्षिकेविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. बाल हक्क आयोगानंदेखील शिक्षिकेविरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

व्हिडीओमध्ये महिलेने विशिष्ट धर्माला उद्देशून काही शब्द वापरले आहेत. त्याला पोलिसांनीदेखील दुजोरा दिला आहे. पोलीस अधीक्षक सत्यनारायण प्रजापती यांनी या प्रकरणी अधिक माहिती दिली. ‘आम्ही व्हायरल व्हिडीओची दखल घेतली आहे. एक शिक्षिका गणिताच्या तासाला पाढे न येणाऱ्या विद्यार्थ्याच्या (मुस्लिम विद्यार्थ्याला) थोबाडीत मारण्यास सांगते. या व्हिडीओ संदर्भात आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांशीदेखील बोललो आहोत,’ असं प्रजापती यांनी सांगितले. मुस्लिम मुलांच्या माता त्यांच्या मुलांच्या अभ्यासावर लक्ष देत नाहीत. मुलांच्या शिक्षणातील अधोगतीला त्याच जबाबदार असतात, असे शिक्षिकेने वर्गात म्हंटले. या विधानांची दखल पोलिसांनी घेतली आहे. आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांना याची माहिती दिली आहे.

त्या शिक्षिकेवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. मुजफ्फरनगरच्या नेहा पब्लिक स्कूलमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला आहे.

शिक्षिकेने मुलाला खूप त्रास दिला. इतर मुलांना त्याला मारायला सांगितले. याची तक्रार करण्यासाठी आम्ही शाळेत गेलो होतो. तेंव्हा आम्हाला इथे असंच होतं, असं उत्तर मिळालं. दोन समाजामध्ये विष पसरविण्याचे काम करणाऱ्या या विषारी शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित मुलाच्या वडिलांनी केली आहे.

‘ या आरोपी शिक्षिकेने वारंवार माझ्या मुलाला मारहाण करायला लावली. माझा पुतण्या काही कामानिमित्त शाळेत गेला होता. तेंव्हा त्याने शिक्षिकेकडून सुरू असलेला प्रकार पाहिला आणि तो मोबाईलमध्ये चित्रित केला,’ असे पीडित मुलाच्या वडिलांनी सांगितले आहे.